ETV Bharat / state

एनसीबी अधीक्षकाला पोलिसांनी केली अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण... - NCB officer arrested

मुंबईतील एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला परळी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नेमकं काय प्रकरण घडले आहे ते वाचा सविस्तर.....

NCB superintendent arrested by parali police in Mumbai
मुंबईत एनसीबी अधीक्षकाला अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण
author img

By

Published : Oct 8, 2021, 5:20 PM IST

Updated : Oct 8, 2021, 5:30 PM IST

बीड - उदगीर-लातूर रोडदरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद-हडपसर रेल्वेमध्ये गुरुवारी रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई येथील अधिकारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

परळी पोलिसांनी घेतले ताब्यात -

या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे. या बाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोडदरम्यान घडला आहे. आज (शुक्रवार) अटक करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

हेही वाचा - एनसीबीचे अधिकारीही भाजप नेत्यांची भाषा बोलतायेत - नवाब मलिक

Last Updated : Oct 8, 2021, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.