बीड: जिल्ह्यातील 400 ते 500 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी अनेक भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. या खंडेश्वरी मंदिराच्या जागेवर पूर्वी काळोबा धनगर नावाचा एक धनगर समाजाचे व्यक्ती आपल्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी राहत होता. दिवसभर कुठेही मेंढ्या चारायच्या व संध्याकाळी या ठिकाणी येऊन विश्रांती करायचा. काळुबाई धनगर हे अत्यंत श्रद्धाळू होते, ते माहूरच्या देवीची मनोभावे पूजा करत असायचे. त्यामुळे त्यांनी माहूरच्या देवीला आपल्या अडचणी सांगायचे. तसेच देवी काळुबाई धनगराच्या इच्छा पूर्ण करत गेली, व काळोबा धनगराला माहूरची देवी प्रसन्न झाली.
धनगराच्या मागे देवी: काळुबा धनगर हे वयोवृद्ध झाले होते. नंतर आपली इच्छा माहूरच्या देवीला बोलून दाखवली की, मी आता येऊ शकत नाही मी थकलो आहे. म्हणून देवीने काळोबा धनगराला सांगितले की, तू आता येण्याची आवश्यकता नाही, मीच तुझ्या वाड्याला येत आहे. मग काळुबा धनगर या ठिकाणी पोहोचल्यावर पाठीमागे पाहिले तर, साक्षात देवी काळुबा धनगराच्या मागे येऊन साक्षात दर्शन दिले. तेव्हापासून या ठिकाणी खंडेश्वरी मातेच्या मंदिराची स्थापना झाली.
काय आहे मंदिराची आख्यायिका: 400 ते 500 वर्षांपूर्वी या ठिकाणी काळुबा धनगर समाजाचे होता. पूर्वी मेंढ्याचे वाढगे होते, काळुबा धनगर माहूरच्या देवीची सेवा करायचे माहुरला जायचे, अत्यंत मनोभावे माहूरच्या देवीची सेवा करायचे. मात्र वयोवृद्ध झाल्यानंतर देवीची सेवा करण्यासाठी येणे होणार नाही,असे देवीला सांगितले होते. देवीने सांगितले की, तू आता येऊ नकोस मीच तुझ्याबरोबर तुझ्या पाठीमागे येते. त्यावेळेस काळुबाई धनगराला साक्षात दर्शन दिले. तेव्हापासून खंडेश्वरी देवी साक्षात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर या मंदिराचा जिर्णोद्धार सर्व भाविकांच्या वतीने करण्यात आला आहे. गुरव व खनाळ यांची बारावी पिढी आहे. हे मंदिर हेमाडपंती असून याचा जिर्णोद्धार रणजीत सिंग चव्हाण व सर्व भाविक भक्तांनी मिळून केलेला आहे. जे लोक मनोभावे देवीची पूजा करतात त्यांच्या मनोकामना देवी पूर्ण करते.
या देवीचे कधी होतात उत्सव: माहूरच्या देवीची यात्रा नवरात्रमध्ये नऊ दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते. तर चैत्र पौर्णिमा ही मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा साजरी होते. तसेच प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून खंडेश्वरीला ओळखले जाते.
नवसाला पावणारी खंडेश्वरी माता: बीड जिल्ह्यातील सर्वच लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी आहे. साक्षात माहूरच्या देवीची प्रतिकृती आहे. ज्या लोकांचे माहूरच्या देवीचे कुलदैवत आहे, ते लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान वाटते आणि दिवसभर मन प्रसन्न राहते,असे भाविक सांगतात. भाविक अंजली सांगतात की, त्या लहानपणा पासून या मंदिरात प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी दर्शनाला येतात. त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. जे जे साकडे देवीला घातले ते देवीने त्यांना दिले आहे, एकही इच्छा या देवीने अपूर्ण ठेवलेली नाही, परिपूर्ण खंडेश्वरी देवी आहे. त्या लहानपणापासूनच या ठिकाणी दर्शनाला येत आहेत.
हेही वाचा: Papaneshwar Temple भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे पापनेश्वर मंदिर जाणून घ्या आख्यायिका