ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत; कवडीमोल भावाने विकावी लागतात खरबूज - lockdown effect on farmers

देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. किरकोळ खरेदीला ग्राहक नसल्याने कवडीमोल दराने कृषिमाल विकावा लागत आहे. भाव मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

muskmelon growers farmer story beed  खरबूज उत्पादक शेतकरी बातमी बीड  बीड लेटेस्ट न्युज  शेतकऱ्यांवर लॉकडाऊन परिणाम  lockdown effect on farmers  beed latest news
लॉकडाऊनमुळे खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत; कवडीमोल भावाने विकावी लागतात खरबूज
author img

By

Published : May 15, 2020, 12:59 PM IST

Updated : May 15, 2020, 1:23 PM IST

बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. बाजारपेठा बंद आहेत. काही तासांसाठी फळविक्री करण्याची परवानगी आहे. मात्र, यादरम्यान फळ, भाज्या कवडीमोल भावाने विकाव्या लागत असल्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

लॉकडाऊनमुळे खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत; कवडीमोल भावाने विकावी लागतात खरबूज

नंदागौळ येथील शेतकरी नागराज गित्ते यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना दोन एकर शेतात खरबूज पीकांची लागवड केली. त्यासाठी खर्च केला. पाणी उपलब्ध असल्याने खरबूज पीकही जोमात आले आहे. पंरतु, बाजारपेठ उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे भाव नाही. त्यामुळे बाजारपेठेत कवडीमोल भावाने विक्री होत आहे, ते परवडणारे नाही. त्यामुळे मेहनतीने पिकवलेल्या खरबूज पिकावर नांगर फिरवण्याची वेळ गित्ते यांच्यावर आली आहे.

ठिंबक, मल्चिंग, औषध फवारणी, मजुरांचा पगार, असा खर्च एकूण एकरी एक ते दोन लाख रुपये केला आहे. मात्र, बाजारभाव नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Last Updated : May 15, 2020, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.