ETV Bharat / state

पात्रूड येथे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून - crime news

माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

murder-of-brother-in-majalgaon-over-property-dispute
पात्रूड येथे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
author img

By

Published : Mar 9, 2021, 4:36 AM IST

बीड - माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने तालुका हादरला असून खुनाला संपत्तीच्या वादाची किनार आहे.

दोघा भावांमध्ये संपत्तीवरुन वाद-

पोलिसांच्या माहितीनुसार, पात्रूड येथे मुख्य रस्ता असलेल्या माजलगाव -तेलगाव रोडवर शेख ईशाद शेख शकील (३०) व त्याचा लहान भाऊ शेख अर्शद शेख शकील (२५) यांची मोबाईल शॉपी आहे. या दोघा भावांमध्ये संपत्तीवरुन वाद होता. यातूनच सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातून अर्शदने शेख ईशाद याला चाकूने भोसकले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपी ताब्यात-

शेख ईशादला शेख अर्शदने भररस्त्यात चाकूने वार करुन संपवले. भावाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून शेख अर्शदने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामीण पोलिसांनी त्यास तातडीने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त केला असून अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा- मुंबईत लसीकरणानंतर एका वृद्धाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.