ETV Bharat / state

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा खून; केज तालुक्यातील घटना

author img

By

Published : Oct 30, 2020, 10:11 PM IST

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात साळेगाव येथे कापूस वेचण्यासाठी शेतात गेलेल्या एका 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे.

murder
खून

बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यात साळेगाव येथे कापूस वेचण्यासाठी शेतात गेलेल्या एका 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. घटनास्थळी मृतदेह विवस्त्र अवस्थेत पडला होता. केज पोलिसात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

आश्विनी समाधान इंगळे ( वय २४ ) ही महिला शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. शेतात गेल्यानंतर या महिलेने कापूस वेचून ढिगारा घालून ठेवला होता. त्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांनी आश्विनी इंगळे यांचा गळा आवळून आणि कपाळावर दगड मारून निर्घृणपणे खून केला. मारेकऱ्यांनी आश्विनी इंगळे यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह शेजारी शेतकरी राहुल शामराव जाधव यांच्या कापसाच्या शेतात टाकून देऊन पसार झाले.

मृतदेहाजवळ दगड, स्कार्फ पडलेला होता. तर मृतदेहापासून काही अंतरावर कानातील एक दागिना, हेअर पिन, वेचुन ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायातील एक बूट व दुसरा बूट काही अंतरावर पडलेला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, फौजदार श्रीराम काळे, फौजदार दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तालुका रुग्णालयात पाठवून दिला.

मृत महिलेचे वडील सर्जेराव भीमराव सोनवणे ( रा. सारणी ( आ. ) ता. केज ) यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध केज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.