बीड - दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या आई व मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथे घडली आहे. हा मुलगा इयत्ता नववीत शिकत होता. शितल बडे, ओंकार बडे असे मृत आई व मुलाचे नाव आहे.
हेही वाचा अकोल्यातील तापी नदीच्या पुरात वाहून गेलेला युवक चार दिवसांनी सापडला
रविवारी शितल कल्याण बडे (वय ३७) या त्यांची मुले प्रतिक व ओंकार यांच्यासह कपडे धुण्यासाठी तलावाकडे गेल्या होत्या. यावेळी मुले पाण्यात खेळत होती.
दरम्यान, प्रतिक खोल पाण्यात पडल्याने बुडू लागला. हे पाहून मोठा मुलगा ओंकार आणि पाठोपाठ शितल यांनीही पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोहता येत नसल्याने शितल व ओंकार बुडाले. इतर महिलांनी आरडा ओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. उपस्थितांनी तलावात उड्या मारल्याने प्रतिकला वाचवण्यात यश आले.
हेही वाचा नागपुरातील अंबाझरी तलावात इंजिनियर युवकाचा बुडून मृत्यू
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिंद्रूड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन व मृतदेह पाण्याबाहेर काढलेय यानंतर पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे कासारी बोडखा परिसरात शोककळा पसरली आहे.