ETV Bharat / state

कोरोना नियमांचे पालन करत बीडमध्ये 5 हजार विद्यार्थ्यांनी दिली 'नीट' परीक्षा

author img

By

Published : Sep 13, 2020, 10:21 PM IST

Updated : Sep 13, 2020, 10:35 PM IST

बीड जिल्ह्यात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यावेळी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांते पालन करण्यात आले होते.

विद्यार्थी
विद्यार्थी

बीड - जिल्ह्यातील एकूण वीस परीक्षा केंद्रांवर 5 हजारांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. 13 सप्टें.) नीटची परीक्षा दिली. यावेळी सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) विविध केंद्रांवर शांततेत परीक्षा झाली असल्याची माहिती समन्वयक बी. डी. कोटवानी यांनी दिली.

बीड शहरासह जिल्ह्यात एकूण वीस केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये शहरातील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावर 840 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था दाखवण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आली होती. तसेच कोविडच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी महाविद्यालय परिसरात एक मीटर चे अंतर ठेवून एक चौरस फुटाचे अंतर ठेवून 300 रखाने पाच रांगांमध्ये तयार करण्यात आले. 840 विद्यार्थ्यांसाठी 74 दालनात आसनव्यवस्था करण्यात आली होती. तसेच 4 हॉलमध्ये आयसोलेटेड आसन व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना पेन, मास्क, पाणी बॉटल, बिस्कीट आणि हॅन्डग्लोज या कीटचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आले.

हेही वाचा - परळी बाजारपेठ लॉकडाऊन; व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरात शुकशुकाट

Last Updated : Sep 13, 2020, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.