बीड - स्थलांतरामध्ये राज्यात बीड जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर आहे. कंटेनमेंट झोनमधून हजारो कामगार बीड जिल्ह्यातील गावांमध्ये आलेले आहेत. असे असताना देखील त्या लोकांना त्यांच्या घरी जाऊ दिले जात आहे. जे लोक मुंबई- पुण्यावरून बीड जिल्ह्यात येत आहेत, त्यांना घरी जाऊ न देता संस्थात्मक क्वारंटाईन करणे अपेक्षित होते. मात्र, तशी कुठलीच यंत्रणा जिल्हा प्रशासन सद्यस्थितीत राबवत नाही. या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील गावे असुरक्षित झालेली आहेत, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील गावे असुरक्षित - आमदार सुरेश धस - महाविकास आघाडीवर आमदार धस यांचा आरोप
शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील गावे सुरक्षित झालेली आहेत. पुणे-मुंबईसारख्या कंटेनमेंट झोनमधून आलेल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे कुठलेच नियोजन शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे नाही, असा आरोप देखील आमदार धस यांनी यावेळी केला.