ETV Bharat / state

मृत कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी बीड जिल्हा प्रशासनाकडे नाही, आमदार धस यांचा आरोप

author img

By

Published : Jun 6, 2021, 5:36 PM IST

धस म्हणाले की, बीड जिल्ह्यात अनेक नागरिक पॉझिटिव्ह झाले, त्यांचा मृत्यूही झाला. मात्र, स्थानिक नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर याची नोंद न झाल्याने नेमके किती रुग्णांनी आपला जीव गमावला, याची नोंद बीड जिल्हा प्रशासनाकडे  नाही, असा आरोप आमदार धस यांनी केला.

Dead Corona Patient number Case Beed
आमदार सुरेश धस आरोप

आष्टी (बीड) - आष्टी तालुक्यात सद्यस्थितीत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या प्रशासनाकडे असलेल्या पोर्टलवर 108 असून, प्रत्यक्षात ही संख्या 333 आहे. यावरून बीड जिल्ह्याची आकडेवारी प्रशासनाने पुढील दोन दिवसांत तपासून घ्यावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनाथ मुलांच्या नावे घोषित केलेल्या 10 लाख रुपयांच्या मदतीपासून अनेक कुटुंबे मुकण्याची शक्यता आहे, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

हेही वाचा - लस चोरून आणणाऱ्या 'त्या' कर्मचाराला माफीनामा लिहून दिले सोडून !

दुसरीकडे पोलिसांची हप्तेखोरी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात मोठी डोकेदुखी ठरत असल्याने पोलीस प्रशासन दिसत असून आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, अशी आवस्था झाल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी केली.

नेमके किती रुग्णांनी जीव गमवला याची नोंद प्रशासनाकडे नाही - धस

आमदार धस हे आष्टी येथील निवासस्थानी आज सकाळी दहा वाजता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. धस म्हणाले की, बीड जिल्ह्यात अनेक नागरिक पॉझिटिव्ह झाले, त्यांचा मृत्यूही झाला. मात्र, स्थानिक नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर याची नोंद न झाल्याने नेमके किती रुग्णांनी आपला जीव गमावला, याची नोंद बीड जिल्हा प्रशासनाकडे नाही, असा आरोप आमदार धस यांनी केला.

अवैध धंदे बोकाळले, पोलिसांची डोळेझाक - धस

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार एखादी व्यक्ती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तर तो गुन्हा नोंदवून घेणे पोलिसांचे काम आहे. त्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी होणे क्रमप्राप्त असते. मी चार वेळा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. परंतु, माझी तक्रार जर पोलीस प्रशासन घेत नसेल तर सामान्य नागरिकांना हे पोलीस प्रशासन काय वागणूक देत असेल याचा विचार न केलेलाच बरा, असे धस म्हणाले. पोलिसांवर निशाना साधत कोरोनाच्या कालावधीत आष्टी-पाटोदा-शिरुर सह आदी ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत. गावोगावी मटके सुरू आहेत. धानोरा येथे मटका किंग आहे, तो पोलिसांना सापडत नाही, गोवंश हत्या सर्रास होत आहेत. पोलिसांची अशा काळातही हप्तेखोरी सुरू असून या सगळ्या प्रकाराकडे पोलीस डोळेझाक करत असल्याचा आरोप धस यांनी केला.

युरीयाचा काळा बाजार जोरात सुरू - धस

सद्यस्थितीत मान्सून सुरू झाल्याचे या आठवड्यातील चित्र असल्याने शेतकरी वर्ग आता पेरणीकडे वळत आहे. मात्र, दुसरीकडे युरीयाचा काळा बाजार जोरात सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याने याची चौकशी होऊन संबंधित कृषी चालकावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी धस यांनी केली.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर भव्यदिव्य मोर्चा काढणार

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. शिवाय ओबीसींचे राजकीय आरक्षण देखील पूर्ववत व्हावे यासाठी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रात कुठेच होणार नाही इतका भव्यदिव्य मोर्चा आपण काढून आरक्षणाचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पडणार असल्याचेही धस यांनी सांगितले.

हेही वाचा - ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी शासकीय वसतिगृहे; मुलांच्या हातातील कोयता सुटणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.