बीड - जिल्ह्यातील सिंचन वाढावे या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. जिल्ह्यात तब्बल 10 हजार अनुदान विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. बीड विधानसभा मतदार संघामध्ये 2 हजार विहींरीचा समावेश असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
दुष्काळ आणि निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणींचा सामना करीत आहे. बीड जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी अनुदान विहिरींची संख्या वाढली पाहिजे या उद्देशाने आमदार क्षीरसागर प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. बीड जिल्ह्यासाठी तब्बल 10 हजार अनुदान विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. यात बीड विधानसभा मतदार संघासाठी 2 हजार विहिरींचा समावेश करण्यात आला आहे. गावागावातील शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. अनुदान विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. दीर्घकालीन योजना राबवण्यास प्राधान्य देत असल्यामुळे अनेक गावांना दिलासा मिळत असल्याचे आमदार क्षीरसागर म्हणाले.