ETV Bharat / state

धुळे, गिरीश महाजन महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारपासून दूर?

author img

By

Published : Oct 16, 2019, 12:12 PM IST

Updated : Oct 16, 2019, 3:52 PM IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपला मिळणे अपेक्षित होते. नुकत्याच झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. यामुळे या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी करणे सोपे होणार होते. मात्र, महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे,

मंत्री गिरीश महाजन प्रचार धुळे

धुळे - जिल्हा विधानसभेची जबाबदारी ही भाजपचे संकटमोचक तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आहे. तरीही ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेप्रसंगी गिरीश महाजन हे अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपला मिळणे अपेक्षित होते. नुकत्याच झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. यामुळे या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी करणे सोपे होणार होते. मात्र, महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे, यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा शिवसेनेला देऊन तसेच हिलाल माळी यांना उमेदवारी देऊन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केल्याचे सांगण्यात येत आहे, धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीदेखील अपक्ष उमेदवारी केली आहे. एकीकडे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यामुळे शिवसेनेला विजयापासून दूर ठेवण्यासाठी तसेच अनिल गोटे यांना पराभूत करण्यासाठी राजवर्धन कदमबांडे यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे,

हेही वाचा - 'राज्य सरकारचा ५ वर्षातला कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो'

एकीकडे धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, भाजपचे नगरसेवक आणि धुळे शहराचे महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह त्यांचे चिरंजीव राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. हिलाल माळी यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत केली जात नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच राजवर्धन कदमबांडे यांना भाजपच्या काही नगरसेवकांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात युतीला भगदाड पडले आहे. मात्र, या सगळ्या राजकीय खेळीपासून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे दूर आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. कारण, संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गिरीश महाजन हे महायुतीच्या अर्थात शिवसेनेच्या हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी आजवर धुळे शहरात दाखल झालेले नाहीत. नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेप्रसंगी देखील गिरीश महाजन हे अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना भाजपच्या नगरसेवकांनी दिलेला पाठिंबा पाहता धुळे शहरात महायुती ही फक्त नावापुरती शिल्लक राहिली असल्याचे दिसत आहे. या सगळ्या राजकीय खेळीचा फायदा नेमका कुणाला होतो हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Intro:धुळे जिल्हा विधानसभेची जबाबदारी देण्यात आलेल्या आणि भाजपचे संकटमोचक तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे, नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेप्रसंगी गिरीश महाजन हे अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहेBody:विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे, धुळे शहर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, धुळे शहर विधानसभा मतदार संघाची जागा ही भाजपला मिळणे अपेक्षित होते. नुकत्याच झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली होती. यामुळे या ठिकाणी भाजपाचा उमेदवार विजय करण सोपं होणार होतं. मात्र महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे, यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ही जागा शिवसेनेला देऊन तसेच हिलाल माळी यांना उमेदवारी देऊन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केल्याच सांगण्यात येत आहे, धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीदेखील अपक्ष उमेदवारी केली आहे, एकीकडे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे, यामुळे शिवसेनेला विजयापासून दूर ठेवण्यासाठी तसेच अनिल गोटे यांना पराभूत करण्यासाठी राजवर्धन कदमबांडे यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, एकीकडे धुळे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे, मात्र भाजपचे नगरसेवक आणि धुळे शहराचे महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह त्यांचे चिरंजीव राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार करताना दिसत आहेत, हिलाल माळी यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत केली जात नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे, तसेच राजवर्धन कदमबांडे यांना भाजपच्या काही नगरसेवकांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे, यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात युतीला भगदाड पडले आहे, मात्र या सगळ्या राजकीय खेळी पासून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे दूर आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे, कारण संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गिरीश महाजन हे महायुतीच्या अर्थात शिवसेनेच्या हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी आजवर धुळे शहरात दाखल झालेले नाहीत, नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली, या सभेप्रसंगी देखिल गिरीश महाजन हे अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे, गिरीश महाजन यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना भाजपाच्या नगरसेवकांनी दिलेला पाठिंबा पाहता धुळे शहरात महायुती ही फक्त नावापुरती शिल्लक राहिली असल्याचे दिसत आहे. या सगळ्या राजकीय खेळीचा फायदा नेमका कुणाला होतो हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.