ETV Bharat / state

विद्यार्थ्यांची 'ऑनलाइन' उपस्थिती ग्राह्य धरून त्यांना शिष्यवृत्ती द्या - धनंजय मुंडे - शिष्यवृत्ती बातमी

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, ऑनलाइन, ऑपलाइन आदी पद्धतीने शिक्षण सुरू आहेत. यामुळे ऑनलाइन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती, विद्यावेतन व इतर योजनांचा लाभ देण्यात यावे, असे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे
author img

By

Published : Feb 3, 2021, 4:44 PM IST

मुंबई/बीड - कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असले तरी ऑनलाइन, ऑफलाइन आदी पद्धतीने बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत.

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास आर्थिक सहाय मिळावे या दृष्टीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विविध योजना सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविल्या जातात. राज्यातील बहुतांश महाविद्यालयात सध्या कोरोनामुळे विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत. 2020-21 यावर्षी नूतनिकरणासह नवीन अर्ज महाविद्यालय स्तरावरून सामाजिक न्याय विभागाकडे सादर करताना ज्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हजेरी 75 टक्के असते, अशाच विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाचे प्राचार्य, पोर्टलवरुन सामाजिक न्याय विभागाकडे सादर करू शकतात.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थिती देणे शक्य नव्हते, ही अडचण लक्षात घेवून कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून, त्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.