बीड : तालुक्यातील अंजनवती येथे तुकाविप्र संस्था असून या संस्थानवर मध्यरात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामध्ये संस्थानवरील महिलांना जबरी मारहाण केली. महिला गंभीरित्या जखमी असून त्यांना उपचारासाठी बीड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले यामध्ये दरोडेखोरांनी नगदी रकमेसह दागिने लंपास केली आहेत आहे.
मध्यरात्री 2 सुमारास टाकला दरोडा : बीड तालुक्यातील अंजनवती गावातील येडे वस्तीवर श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिर असून याठिकाणी मध्यरात्री 2 सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. चोरांनी मध्यरात्री 2 वाजता दार तोडून आत संस्थानात प्रवेश केला. याचवेळी आपल्या निवासस्थानात पुजारी कृष्णा जोशी झोपलेले होते. चोरांनी त्यांच्या रूमला बाहेरून कडी लावली.
दरोडेखोरांनी दिड तोळे सोने केले लंपास : त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या जोशी यांच्या पत्नी गीता जोशी वय ४५ वर्ष यांना जबर मारहाण केली. तसेच गीता जोशी यांच्या सासुबाईबाईला देखील मारहाण करण्यात आली आहे. गीता जोशी यांच्या डोळ्याखाली जखम असुन सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे ही डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरोड्यामध्ये दरोडेखोरांनी दिड तोळे सोने, काही रक्कम लंपास करीत धुम ठोकली आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल : सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय शेख मुस्तफा, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, हवालदार राख तसेच पोलिस नागरगोजे, हवालदार सचिन डिडुळ बीड तालुक्यातील श्रीसंत तुका विप्र संस्थानवर घटनास्थळी धाव घेतली. महिलांना मारहाण केल्यानंतर दरोडेखोरांनी दागिन्यांसह रोख रक्कम लुटून तेथून पळ काढला. या दरोड्यात दरोडेखोरांनी अर्धा तोळे सोने चोरून नेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय दुलत, त्यांची टीम तसेच श्वानपथक दाखल झाले असून पुढील तपास शेख मुस्तफा करत आहेत. श्रीसंत तुका विप्र संस्थानवर मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे.