बीड Beed Maratha reservation : बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये शनिवारी मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. इतकच नाही तर आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आष्टी तहसीलदार यांच्या घरासमोर उभी असलेली गाडी अज्ञात व्यक्तीनं जाळण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील सर्वच बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
बस सेवा पूर्णतः बंद : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासंदर्भात रात्री उशिरा मराठा तरुणांनी धुळे-सोलापूर रोडवर आंदोलन केले. त्यानंतर काही वेळातच आहेर वडगाव या ठिकाणी बीड कोल्हापूर बस क्रमांक Mh- 09 FM -0075 मराठा आंदोलकांकडून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच्या काही वेळानंतरच आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या घरासमोरील गाडी पेटवण्यात आल्याची माहिती समोर आली. यामुळं बीड जिल्ह्यातील बस सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
गाडी जळून खाक : नगर रस्त्यावर जुन्या तहसीलदार निवासा समोर प्रमोद गायकवाड यांची गाडी लावण्यात आली होती. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गाडीनं पेटल्याचं कळंताच तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला पाचारण करत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गाडी पूर्ण भस्मसात झाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस हे या प्रकरणी तपास करीत आहेत.
बस बंदमुळे प्रवाशांचे हाल : दरम्यान, बीड जिल्ह्यातील 9 डेपो मधून होत असलेली बस सेवा बंद करण्यात आलीये. त्यामुळं अनेक प्रवाशांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय, अनेक प्रवासी प्रवास करून आपल्या घराकडं जाण्यासाठी निघाले आहेत. तर काहींना आपल्या गावी जायचे आहे. मात्र, मराठा आरक्षण आता हिंसक वळण घेत असल्यानं प्रवाशांना आहोत तिथंच थांबावं लागणार आहे.
हेही वाचा -