आष्टी(बीड) - स्थानिक गुन्हे शाखेकडून आष्टीत गावठी पिस्तुलसह एका आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. रामचंद्र शिवाजी पवार ( वय 30, रा.वटणवाडी ता.आष्टी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आष्टी येथील लिमटाका चौकात ही कारवाई करण्यात आली आहे.
बीड स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुप्त मिळालेल्या माहितीच्या अधारे ही कारवाई करण्या आली आहे. आष्टी येथील लिमटाका चौकात अवैध गावठी पिस्टलसह रामचंद्र शिवाजी पवार (30)याला ताब्यात घेतले आहे. याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यात विना परवाना पिस्टल बाळगत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली होती. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी.सी.गोसावी, पोलीस प्रसाद कदम, अशोक दुबाले यांच्या पथकाने शनिवारी राञी आठच्या सुमारास आष्टी येथे पेट्रोलिंग करत असताना एका संशयिताची झडती केली. त्याकडे गावठी पिस्टल आढळून आले. त्याच्याकडे याबाबत परवाना नसल्याचे समजताच त्याची सखोल चौकशी केली. रामचंद्र शिवाजी पवार याच्यावर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.