बीड : बीडसह परळी मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे पाठोपाठ पंकजा मुंडे ( Dhananjay Munde followed by Pankaja Munde ) यांचाही ग्रामपंचायतिच्या विजयावर दावा केला आहे. परळीसह बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात येतील असा विश्वास व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या विजयाचा दावा भाजप नेत्या पंकजा मुंडे ( BJP leader Pankaja Munde) यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या येत Gram Panchayat claims victory असल्याचा दावा केला होता. परळी मतदार संघातील घाटनांदुरसह मोठ्या ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आल्या असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे बहिण भावाच्या दावे प्रतिदावे यामुळें ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात हे अंतिम निकाल हाती आल्यानंतर समोरे येणार आहे.
परळी मतदारसंघात राष्ट्रवादीची देखील बाजी : बीडच्या परळी मतदारसंघात मुंडे ( Munde in Parli Constituency of Beed ) बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायती मधील प्राथमिक निकाल हाती ( Preliminary result in Gram Panchayat ) आले. त्यामध्ये परळी मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. सकारात्मक निकाल हाती येत असल्याने धनंजय मुंडे यांच्या घरासमोर विजयी जल्लोषाची तयारी करण्यात आली असून धनंजय मुंडे सहभागी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले.