Live Update :
- पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-
प्रितम मुंडे (भाजप ) ६ लाख ७८ हजार १७५ मते मिळाली.
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) ५ लाख ९८ हजार ०७ मते
विष्णू जाधव (बहुजन वंचित आघाडी) ९२ हजार १३९ मते
- 5.19- प्रीतम मुंडे 1 लाख 65 हजारांनी आघाडीवर
- 4.09- 26 व्या फेरी अखेर प्रीतम मुंडे 1 लाख 65 हजार मतांनी आघाडीवर
- 4.00- 24 व्या फेरीअखेर भाजपच्या प्रीतम मुंडे यांना एक लाख ५३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे
- 1.37pm- 19 व्या फेरी अखेर प्रीतम मुंडे 1 लाख मतांनी आघाडीवर
- 1.14pm- चौदाव्या फेरीच्या अखेरीस प्रीतम मुंडे 68297 मतांनी आघाडीवर
- 12.16pm- अकराव्या फेरी अखेर प्रितम मुंडे 52 हजारांनी आघाडीवर. बीड विधीनसभा वगळता ईतर पाच विधानसभा मतरदारसंघात भाजप आघाडीवर
- 11.31 am- आठव्या फेरी नंतर भाजच्या प्रितम मुंडे ५५ हजारांनी आघाडीवर
- 11.02 am-सातव्या फेरी अखेर भाजच्या प्रितम मुंडे यांना 47 हजारांची आघाडी
- 10.15 am- बीडमध्ये प्रीतम मुंडे चौथ्या फेरीत अखेर 29 हजार मतांनी आघाडीवर मात्र पंकजा मुंडेच्या मतदार संघात पिछाडीवर
- 9.34 am- दुसऱ्या फेरीअखेर 14 हजार मतांनी आघाडीवर
- 8.00 am - प्रत्यक्ष मतमोजणीला सुरू. पहिल्यांदा पोस्टल मत मोजणी सुरू
बीड - बीड लोकसभा मतदार संघात कोण बाजी मारणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यातील अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. बीडचा खासदार कोण? याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता येथून प्रीतम मुंडे यांनी पुन्हा विजयी होत बजरंग सोनवणे यांना पराभूत करत दिल्ली गाठली आहे.
येथून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी युतीच्या उमेदवारासाठी तर विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. या मतदारसंघात युतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे मैदानात उतरले. संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले होती. अत्यंत तुल्यबळ अशी ही लढत समजली जात होती. बीड लोकसभा मतदारसंघात ६६. ७५ टक्के मतदान झाले होते.
येथे होणार मतमोजणी
एकूण सहा खोल्या व 14 टेबलवरून लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. यासाठी अडीच हजारांहून अधिक कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी सज्ज आहेत. बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले आहे.
२०१४ ची परिस्थिती
२०१४ च्या निवडणुकीत गोपानाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यात लढत झाली होती. यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला होता. ३ जून २०१४ ला गोपीनाथ मुंडेंचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक लागली. त्यावेळी भाजपकडून डॉ. प्रितम मुंडेंना निवडुकीत उतरविण्यात आले. यावेळी त्यांच्याविरोधी काँग्रेसच्या अशोक पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये प्रितम मुंडेंचा तब्बल ७ लाख मताधिक्क्यानी विजय झाला होता.