ETV Bharat / state

गेवराई विधानसभा : पवार-पंडित यांच्यात आरोप-प्रत्यारोप

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष्मण पवार यांच्या विरोधात आरोप केले आहेत. तर लक्ष्मण पवार यांनी मतदारसंघात रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करताना विजयसिंह पंडित यांच्या राजकारणात सातत्य नसल्याचा गंभीर आरोप केला.

पवार-पंडित यांच्यात आरोप-प्रत्यारोप
author img

By

Published : Jul 29, 2019, 11:14 PM IST

Updated : Jul 29, 2019, 11:21 PM IST

बीड - स्वतःला 'कार्यसम्राट' म्हणवणार्‍यांनी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी, शेतमजूर व युवक यांच्या प्रश्नाकडे भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हे दुर्लक्ष करत असल्याचा घणाघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला आहे. तर यावर जे निवडणुकीत ओरडतात ते निवडणुकीनंतर मात्र गायब होतात, असा प्रतिआरोप लक्ष्मण पवार यांनी केला आहे.

याशिवाय शिवसेनेकडून बदामराव पंडित हे गेवराई विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र शिवसेना-भाजपची युती असल्याने बदमराव पंडित यांची गोची झालेली आहे. एकंदरीत तीनही प्रमुख पक्षाचे शिलेदार मतदारसंघात फिरत असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू -

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष्मण पवार यांच्या विरोधात आरोप केले आहेत. तर लक्ष्मण पवार यांनी मतदारसंघात रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करताना विजयसिंह पंडित यांच्या राजकारणात सातत्य नसल्याचा गंभीर आरोप केला.

गेवराई विधानसभेवर कोणाचा झेंडा?

गेवराई विधानसभा मतदारसंघात दोन पंडित व पवार यांचे प्राबल्य आहे. शिवसेनेकडून बदामराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे छोटे भाऊ तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे संभाव्य उमेदवार असू शकतात. याशिवाय भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे निवडणूक लढवतील. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५० हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार म्हणून लक्ष्मण पवार यांची ओळख आहे. मात्र, मागील ५ वर्षात बऱ्याच प्रमाणात पुलाखालून पाणी गेलेले आहे.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप -

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षाचे शिलेदार सक्षम असल्याने या मतदारसंघात आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य पाहायला मिळत आहे. आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अथवा कार्यकर्त्यांच्या संकटकाळात धावून जाण्यासाठी तीनही पक्षाचे नेते तयार असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांनी मोर्चा काढून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार हे गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. याशिवाय शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार असलेले माजी आमदार बदामराव पंडित हे देखील कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटी घेण्यावर आहेत.

गेवराईमध्ये दीर्घकाळ पंडीतांची सत्ता -

गेवराई विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान ३ लाख ४१ हजार एवढे आहे. या मतदारसंघावर काही अपवादात्मक कालावधी सोडला तर गेवराईतील दोन पंडितांनी दीर्घकाळ सत्ता गाजवलेली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित व माजी आमदार बदामराव पंडित यांचे प्राबल्य या मतदारसंघावर राहिलेले आहे. २०१४ मध्ये भाजपकडून आमदार लक्ष्मण पवार यांनी ५० हजाराहून अधिक मताधिक्‍य घेऊन गेवराई विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकावला होता.

Intro:गेवराई विधानसभा; पवार - पंडित यांच्यात आरोप-प्रत्यारोप

बीड- स्वतःला 'कार्यसम्राट' म्हणवणार्‍यांनी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी शेतमजूर व युवक यांच्या प्रश्नाकडे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हे दुर्लक्ष करत असल्याचा घणाघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला आहे तर भाजपचे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे की, जे निवडणुकीत ओरडतात ते निवडणुकीनंतर मात्र गायब होतात असा प्रतिआरोप त्यांनी केला आहे. याशिवाय शिवसेनेकडून बदामराव पंडित हे गेवराई विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र शिवसेना-भाजप ची युती असल्याने बदमराव पंडित यांची गोची झालेली आहे. एकंदरीत तीनही प्रमुख पक्षाचे शिलेदार मतदारसंघात फिरत असल्याचे चित्र आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदार संघात सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गेवराई चे आमदार यांच्या विरोधात आरोप केले आहेत. याशिवाय गेवराईचे भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी मतदारसंघात रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करताना विजयसिंह पंडित यांच्या राजकारणात सातत्य असल्याचा गंभीर आरोप केला आहे यावरच विधानसभा निवडणुका आल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघात दोन पंडित व पवार यांचे प्राबल्य आहे. शिवसेनेकडून बदामराव पंडित राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमरसिंह माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे छोटे भाऊ तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे संभाव्य उमेदवार असू शकतात. याशिवाय भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे निवडणूक लढवतील. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 50 हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार म्हणून लक्ष्मण पवार यांची ओळख आहे मात्र मागील पाच वर्षात बऱ्याच प्रमाणात पुलाखालून पाणी गेलेले आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षाचे शिलेदार सक्षम असल्याने या विधानसभा मतदारसंघात आता पासूनच आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य पाहायला मिळत आहे. आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अथवा कार्यकर्त्यांच्या संकटकाळात धावून जाण्यासाठी तीनही पक्षाचे नेते तयार असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांनी मोर्चा काढून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार हे गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. याशिवाय शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार असलेले माजी आ. बदामराव पंडित हे देखील कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटी घेण्यावर आहेत.

गेवराई विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान 3 लाख 41 हजार एवढे आहे. गेवराई विधानसभा मतदार संघावर काही अपवादात्मक कालावधी सोडला तर गेवराईतील दोन पंडितांनी दीर्घकाळ सत्ता गाजवलेली आहे. माजी आ. अमरसिंह पंडित व माजी आ. बदामराव पंडित यांचे प्राबल्य गेवराई विधानसभा मतदारसंघावर राहिलेले आहे. 2014 मध्ये भाजपकडून आ. लक्ष्मण पवार यांनी पन्नास हजाराहून अधिक मताधिक्‍य घेऊन गेवराई विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकावला होता.

Body:बीडConclusion:बीड
Last Updated : Jul 29, 2019, 11:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.