ETV Bharat / state

बीडमध्ये 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर कोविड सेंटरची उभारणी - बीड जिल्हा न्यूज अपडेट

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक कोरोनाबाधित सध्या वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांच्या पुढाकारातून माँ वैष्णोदेवी पॅलेस येथे 200 खाटांचे सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

बीडमध्ये 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर कोविड सेंटरची उभारणी

author img

By

Published : Apr 21, 2021, 9:41 PM IST

बीड - बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक कोरोनाबाधित सध्या वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांच्या पुढाकारातून माँ वैष्णोदेवी पॅलेस येथे 200 खाटांचे सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे वैशिष्ट म्हणजे हे कोविड सेंटर ना नफा ना तोटा तत्त्वावर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यात अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. नेमका कोणाला फोन करायचा व कोणाची मदत घ्यायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये संतोष सोहनी यांनी आपल्या मालकीच्या मंगल कार्यालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर दोनशे बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.

कोविड सेंटरमध्ये 26 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या कोवीड सेंटरमध्ये दोन एमडी, चार एमबीबीएस डॉक्टर व वीस नर्स अशा एकूण 26 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा पुरवण्या येत असून, त्यांच्या जेवणाची देखील विशेष काळजी घेण्यात येत आहे. या रुग्णांना दोन वेळा पोस्टीक आहार, फळे, चहा, आयुर्वेदिक काढा देण्यात येतो.

बीडमध्ये 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर कोविड सेंटरची उभारणी

'सेवाभावातून कोविड सेंटरची सुरुवात'

केवळ सेवाभाव म्हणून आम्ही हे कोविड सेंटर सुरू केले आहे. यासाठी शासनाची कुठलीही मदत आम्ही घेतलेली नाही. ना नफा ना तोटा तत्त्वावर हे कोविड सेंटर आम्ही सुरु केलेले आहे. जोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होणार नाही. तोपर्यंत हे कोविड सेंटर सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया संतोष सोहनी यांनी दिली आहे.

'रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न'

आम्ही सुरू केलेल्या या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आम्ही उपचाराबरोबरच त्यांच्या आहारावर देखील विशेष लक्ष देतो. रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी एक समिती सतत कार्यरत असते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर समाजसेवा म्हणून आम्ही हे सुरू केलेलं आहे. या ठिकाणी आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं डॉक्टर महेश गायकवाड यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 41 हजारांवर पोहोचला आहे. त्यातील 35 हजार नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील 741 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - 'नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.