ETV Bharat / state

Beed News: कोकणवासियांची कुलस्वामिनी योगेश्वरी, जाणून घ्या सविस्तर - कुलस्वामिनी योगेश्वरी

योगेश्वरी देवीला कोकण वासियांची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते. नवरात्र महोत्सवामध्ये कोकणातील लोक मोठ्या प्रमाणात योगेश्वरीच्या दर्शनासाठी येतात. हे मंदिर हे 12 व्या शतकातील असून हे फार जुने मंदिर आहे. पावणारी देवी म्हणून या योगेश्वरीची महती आहे. लोकांच्या इच्छा अपेक्षा या ठिकाणी योगेश्वरी देवी पूर्ण करते. त्यामुळे येथे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. आपण या खास रिपोर्टमधून देवीविषयी अधिक जाणून घेवू या.

Beed News
कोकण वासियांची कुलस्वामिनी योगेश्वरी
author img

By

Published : Feb 21, 2023, 8:48 AM IST

Updated : Mar 7, 2023, 8:57 AM IST

बीड : ही देवी कोकण वासीयांची कुलस्वामिनी आहे. ही देवी आंबेजोगाई येथे वास्तव्यास आहे. हे मंदिर 12 व्या शतकातील असुन हे मंदिर पूर्ण दगडी शिल्प आहे. याला कुठलाही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. त्याच्यावरती 12 व्या शतकामध्ये जे कारागीर होते, त्यांनी हे दगडावर कोरीव काम केलेले आहे. या देवीचे नवरात्र उत्सव आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीने अवतार धारण केला म्हणून हा उत्सव विशेष साजरा केला जातो. ही देवी नवसाला पावणारी असून या देवीच्या दर्शनासाठी दररोज दोन ते अडीच हजार भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

7 मजली कळस : विशेष म्हणजे या देवीने योगीनीचे रूप धारण केले असून अनादी काळापासून या देवीला योगेश्वरी नावाने ओळखले जाते. हे शिल्प पूर्णतः दगडी असून बाराव्या शतकातील आहे. पूर्णतः बांधकाम हे दगडी आहे. त्याच्यावर 7 मजली कळस चढवण्यात आलेले आहेत. पूर्वीच्या काळी हा सात मजली कळस हा पूर्णतः दगडाचा होता, मात्र तो फार जुना झाल्यामुळे आता तो सिमेंटचा बनवण्यात आलेला आहे. अशी प्रतिक्रिया श्रीराम देशपांडे विश्वस्थ यांनी दिली.

मनातील इच्छा पूर्ण होतात : मी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणावरून या देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. गेले अनेक वर्ष या देवीच्या दर्शनासाठी येत असतो. देव दर्शनासाठी जात असताना योगेश्वरीचे दर्शन घेतल्याशिवाय समाधानाच होत नाही. या ठिकाणी आल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे योगेश्वरीचे दर्शन घेऊनच आम्ही पुढील दर्शनासाठी जात असतो. अशी प्रतिक्रिया भाविक संतोष जगताप यांनी दिली.

योगेश्वरीच्या दर्शनासाठी योग : मी या ठिकाणी गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच योगेश्वरीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. मागील दहा वर्षांपूर्वी मी याच आंबेजोगाई शहरांमध्ये योगेश्वरी कॉलेजमध्ये असताना रविवारी योगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी येत असायचो. देवीला साकडे घालायचो की, हे आंबे मला नोकरी लागू दे. मी ज्यावेळेस या ठिकाणी कॉलेजला होतो, त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फार बदललेली आहे. त्याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस सीएटी ची तयारी करत होतो. त्यावेळेस आमचं इंजिनियरिंग ध्येय होतं. त्यावेळेस योगेश्वरीच्या दर्शनाला यायचो आणि साकडं घालायचो की, आई आंबे मला यश येऊ दे.सीएटीमध्ये नंबर लागु दे एखाद्या शासकीय कॉलेजमध्ये नंबर लागू दे, आणि घडलंही तसंच. येथे माझा शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयाला माझा नंबर लागला. आता मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करत आहे. तब्बल दहा वर्षानंतर आज योगेश्वरीच्या दर्शनासाठी योग आला आणि मी दर्शनासाठी आलो आहे. अशी प्रतिक्रिया भाविक रामराव नाटकर यांनी दिली.

मनाला समाधान वाटतं : मी पंचायत समिती कोपरगाव येथे शासकीय कार्यालयात कार्यरत असून या ठिकाणी मी दर्शनासाठी आलेलो आहे. देवीने येथे मला भेटीसाठी बोलावले होते, म्हणून आम्ही सर्व मित्रमंडळी म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर मनातील शंका व शंका दूर होतात. विशेष म्हणजे मनाला समाधान वाटतं. ज्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी असतात, त्या दूर होतात. मन प्रसन्न होतं. त्यामुळे आई अंबेच्या दर्शनासाठी यावे, असे वाटते म्हणून आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. अशी प्रतिक्रिया भाविक प्रसाद कोरे यांनी दिली.

हेही वाचा : Mahalakshmi at Ganoja Devi: कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा नवस तुम्ही येथेही फेडू शकता

Last Updated : Mar 7, 2023, 8:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.