ETV Bharat / state

Narayan Gad Beed: धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते बीडमधील नारायण गड; बारा वर्षाला होते शिवलिंगाची निर्मिती

बीड जिल्हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक संत महंत होऊन गेले. बीडपासून जवळच असलेले नारायण गड हे तीर्थक्षेत्र आहे. तीनशे वर्षांपासूनची या ठिकाणी जुनी परंपरा आहे. याबद्द्ल अधिक माहिती या खास रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Beed News
श्री क्षेत्र नारायण गड
author img

By

Published : Mar 19, 2023, 7:55 AM IST

श्री क्षेत्र नारायण गड

बीड : नारायण गड या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बारा वर्षाला एका शिवलिंगाची निर्मिती होते. या ठिकाणी जे संत महंत होऊन गेले, त्यांनी श्री शंभू महादेवाची तपश्चर्या या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी नारायण महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून मला साक्षात्कार दाखवा असे, आवाहन केले होते. त्यांनी साक्षात नारायण महाराज यांना दर्शन दिले. तसेच मी प्रत्येक बारा वर्षाला या ठिकाणी उत्पन्न होईल, हीच माझी ओळख असे महादेवाने त्यांना सांगितले होते. प्रत्येक बारा वर्षाला शिवलिंगाची निर्मिती आपोआप होते, अशी नारायण गडाची ओळख आहे.

जागृत देवस्थान : या गडावर आठ महंत होऊन गेलेले आहेत. या ठिकाणची जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांची ही परंपरा आहे. ठिकाणावरून प्रत्येक आषाढी एकादशीला गेले. तीनशे वर्षांपासून दिंडी या ठिकाणावरून जात आहे. आता फाल्गुन वारीमध्ये नाथ षष्ठीला या ठिकाणावरून दिंडी जाते. ही अनादी वर्षाची परंपरा आजही चालू आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीला तर फार मोठी गर्दीच असते. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नारायण गड हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

काय आहे आख्यायिका : या ठिकाणी पूर्वीचे भगवान शंकराचे मंदिर आहे. या ठिकाणी जे आठ महंत होऊन गेले आहेत. त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. बारा वर्षाला एक लिंग आपोआप तयार होते. हे या नारायणगडाचे महत्व आहे. या ठिकाणी येण्यासाठी कोणालाही आमंत्रण दिले जात नाही. या ठिकाणी भाविक आपोआप येतात. कार्तिक महिन्यामध्ये आठ दिवस या ठिकाणी यात्रा असते. आषाढी एकादशीला सुद्धा मोठ्या मनोभावे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

नारायण गडाचा इतिहास : नारायण गडाचा इतिहास तीनशे वर्षांपूर्वीचा आहे. या ठिकाणी स्वयंभू महादेवाची पिंड आहे. त्या ठिकाणी एवढ्या डोंगरावरती कुठेही खडक नाही. परंतु, स्वयंभू महादेवाची पिंड प्रत्येक बारा वर्षाला तयार होते. नारायण महाराज यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी नारायण गडाची निर्मिती झाली. त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये नारायण महाराजांची 293 पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आज साक्ष देत आहे. नारायण गडला धाकटी पंढरी म्हणून हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते, अशी माहिती शिवाजी महाराज यांनी दिली.

काय आहे नारायण गडाचे महत्त्व : नारायण गडाचे महत्त्व असे आहे की, या ठिकाणी नगद नारायण महाराज यांच्या दर्शनासाठी जो कोणी येतो, त्याला नगद नारायण महाराज भेटतात. अशा प्रकारची प्रचिती या ठिकाणी भाविकांना आलेली आहे. या ठिकाणी भक्तीचा जो सागर आहे, तो फार मोठा प्रमाणात आहे. राष्ट्रात सर्वात जुनी परंपरा म्हणून ओळखली जाणारी दिंडीची परंपरा ही गेले तीनशे वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा आषाढी एकादशीला या ठिकाणावरून न चुकता प्रत्येक वर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे, अशी माहिती भानुदास जाधव यांनी दिली.

हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशींचे पुरुष शेअरबाजारात यशस्वीपणे करू शकतील गुंतवणूक, सृजनशील गोष्टींकडे द्याल लक्ष, वाचा राशी भविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.