ETV Bharat / state

Bada Hanuman Mandir Beed: बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बडा हनुमान; जाणून घ्या काय आहे ख्याती

बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणामध्ये देव देवतांचे पुरातन काळापासूनचे मंदिर बीड जिल्ह्यात पाहायला मिळतात. आपण पाहिले की, बीड जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याचबरोबर शनीच्या साडेतीन पिठांपैकी दीड पीठ बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला जो देवी देवतांचा वारसा लाभलेला आहे, तो काही वेगळाच आहे. मात्र बीड जिल्ह्यात नावाप्रमाणेच असलेला बडा हनुमान याची काय ख्याती आहे. या विषयी जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट वाचा.

Hanuman Mandir Beed
बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बडा हनुमान
author img

By

Published : Feb 27, 2023, 6:55 AM IST

बीड : हे मंदिर पुरातन काळातील आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्णतः दगडी बांधकाम होते. हे बांधकाम 1856 मधील आहे. मूर्ती ही त्या अगोदरच्या काळातील आहे. या हनुमानाचे वैशिष्ट्य असे आहे की, जास्तीत जास्त मारवाडी समाज या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो. या हनुमानाचे नाव पहिले कट्टा हनुमान होते. मारवाडी समाजामध्ये कट्टा हनुमान न म्हणता त्यांनी मोटा हनुमान असे म्हणत, पण मोठा न म्हणता त्यांनी बडा हनुमान म्हणायला सुरुवात केली. तेव्हापासून बडा हनुमान हे नाव पडले आहे. पण पूर्वीचे नाव कट्टा हनुमानच आहे.

सर्वदूर प्रसिद्ध : प्रत्येक शनिवारी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. आलेल्या भाविकांच्या इच्छा मोठ्या मनाने हा बडा हनुमान पूर्ण करतो, त्यामुळे बडा हनुमान सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. राम नवमीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केली जाते. मोठ्या मनोभावे या ठिकाणी इच्छा पूर्ण होतात, अशी माहिती पुजारी योगेश त्रिंबक स्वामी यांनी दिली.

हनुमानाची फार मोठी ख्याती : लहानपणापासून मी या ठिकाणी आमच्या वडिलांबरोबर या ठिकाणी दर्शनाला येत होतो. अजूनही या ठिकाणी दर्शनाला येत आहे, या बडा हनुमानाची फार मोठी ख्याती आहे. रझाकाराच्या काळामध्ये या ठिकाणी छावण्या होत्या. त्या छावण्यामध्ये नोकरीला असलेले हिंदू सैनिक होते. त्यांना दर्शनासाठी बडा हनुमानाची स्थापना केली, आणि तेव्हापासून हा बडा हनुमान इतर प्रसिद्ध आहे. याची मूर्ती आंबेजोगाई शहरातच नव्हे तर परिसरात सगळ्यात मोठी मूर्ती आहे. ज्या पद्धतीचे नाव बडा हनुमान आहे, त्याच पद्धतीची मूर्तीपण आहे. ज्या पद्धतीने आपल्या अडचणी आहेत, त्या मोठ्या मनाने सोडवण्याचे काम बडा हनुमान या ठिकाणी करत आहे. त्यामुळे या हनुमानाचे नाव बडा हनुमान ठेवण्यात आलेले आहे, असे भाविक पूनमचंद परदेशी यांनी सांगितले.

हनुमानाचे वैशिष्ट्य : मी व्यवसायाने वकील आहे. मी गेल्या वीस वर्षापासून याच परिसरात राहतो. गेल्या वीस वर्षापासून बडा हनुमानाचे दर्शन घेतो. आपल्या मनामध्ये ज्या कल्पना असतील, भावना असतील, ज्या मनामध्ये शंका असतील, त्या या ठिकाणी मी बोलून दाखवतो. त्या माझ्या पूर्ण होतात, रझाकाराच्या काळापासून हे मंदिर आहे. या हनुमानाचे वैशिष्ट्य असे आहे की, मोठे मन करून हनुमान आपल्या इच्छा पूर्ण करतात, म्हणून याला बडा हनुमान असे म्हणतात. या ठिकाणी अनेक लोक मोठ्या मनोभावे येऊन हनुमानाची पूजा करतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. माझ्यापण मनामध्ये काही भावना होत्या आणि त्या पूर्ण झाल्या आहेत. जसे नाव बडा हनुमान आहे, तसेच हनुमानाची कीर्तीसुद्धा मोठी आहे, असे भाविक ॲड सुनील नरके यांनी सांगितले.

हेही वाचा : Today Love Rashi : 'या' राशीच्या स्त्रियांनी प्रियकराशी वाद घालू नये, हट्टीपणामुळे नुकसान होऊ शकते; वाचा, लव्ह राशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.