बीड : बीडमधील खंडोबा हा नवसाला पावणारा खंडोबा म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे अनेक लोक प्रत्येक रविवारी येथे येऊन मनोभावे दर्शन घेतात. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस निजामशाही आली, त्यावेळेस खंडोबा मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. खंडोबा मंदिरात बोगदा आहे. या मंदिरापासून बीडच्या बलभीम चौकापर्यंत बोगद्यातून येत असायचे. आता हा बोगदा आहे, तो बंद झालेला आहे. विशेष म्हणजे हे खंडोबा देवस्थान फार पूर्वीच्या काळातले आहे. पाहूयात याविषयीचा ईटीव्ही भारतचा एक स्पेशल रिपोर्ट...
भाविक काय म्हणतात : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एका एमएससीईबी येथे ऑपरेटर म्हणून नोकरी करणाऱ्या भाविकांने त्याचा अनुभव सांगितला. राहुल चोपडे म्हणाले की, या खंडोबा देवाचे महात्म मला माहित नव्हते. मी अनेक जणांकडून ऐकले होते की हा खंडोबा नवसाला पावणारा आहे. म्हणून मी आज या खंडोबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. मंदिर खूप जुने आहे आणि दगडी बांधकाम आहे. या ठिकाणी कुठलेही चुना किंवा सिमेंट वापरले नाही. फक्त दगडावर दगड मांडून या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. खंडोबा मंदीर अत्यंत जुने असून दिसण्यास अत्यंत छान आहे. हे मंदिर खूप जुने असल्यामुळे व हा खंडोबा नवसाला पावणारा खंडोबा म्हणून याची महती आहे, असे राहुल चोपडे म्हणाले.
नवसाला पावणारा खंडोबा : इथे दाखल होणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे की, बीडमधील खंडोबा हा नवसाला पावणारा खंडोबा आहे, असे चंद्रपूरमधील पूजा ताजने म्हणाल्या. हे पुरातन काळातील खंडोबाचे मंदीर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हे शिल्प खूप प्राचीन असल्यामुळे त्याचा देखावा सुद्धा चांगला आहे. पुरातन काळातील असल्यामुळे सर्वांनी या मंदिराला भेट दिली पाहिजे, शासनाने सुद्धा या मंदिराकडे लक्ष द्यावे त्याचबरोबर या मंदिराला सुलभ कसे करता येईल. असे इथे आलेल्या भाविक पूजा ताजने यांनी म्हटले आहे.
दीपमाळावरून संपूर्ण बीड तालुका दिसतो : भाविका बाळासाहेब राऊत सांगतात की, खंडोबाचे महत्त्व असे आहे की ज्या लोकांचा खंडोबा आहे कुळदैवत आहे, ते सर्वजण रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. भाविक या ठिकाणी मनोभावे दर्शन घेण्यासाठी येत असतात. येथे आल्यानंतर मला प्रसन्न वाटते. मन भारावून जाते. रविवार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या दीपमाळा आहेत. त्या दीपमाळा एवढ्या उंच आहेत की त्या दीपमाळावर चढल्यानंतर संपूर्ण बीड तालुका या दीपमाळावरून दिसतो. या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद झाल्याचे बाळासाहेब राऊत यांनी सांगितले.
काय म्हणतात पुजारी : फार प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी मी 1987 पासून मी या देवाची मनोभावे भक्ती करतो, असे पुजारी निवृत्ती खनाळ यांनी सांगितले. गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी लोक रविवारी मोठ्या प्रमाणात येतात गर्दी करतात. दर्शन घेतात आणि मनोभावे या ठिकाणी पूजा करतात. त्याचबरोबर हा खंडोबा नवसाला पावणारा खंडोबा आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाने या खंडोबाकडे लक्ष द्यावे अनेक लोकांच्या इच्छा मनामध्ये असलेल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत.