ETV Bharat / state

Eknath Khadse visit Gopinath gad : गोपीनाथ गडावर नतमस्तक होताच खडसेंचा पंकजा मुंडेंविषयी धक्कादायक खुलासा

author img

By

Published : Jun 3, 2023, 1:46 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज परळीमधील गोपीनाथ गडाला भेट दिली. येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. त्याचबरोबर त्यांनी पंकजा मुंडे यांना भाजपकडून ज्याप्रकारे वागणूक मिळत आहे त्यावर खडसे यांनी खंत व्यक्त केली.

एकनाथ खडसेंनी गोपीनाथ गडाला भेट दिली
एकनाथ खडसेंनी गोपीनाथ गडाला भेट दिली
एकनाथ खडसेंनी गोपीनाथ गडाला भेट दिली

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणनिमित्त बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, धनंजय मुंडे आणि रोहिणी खडसे नतमस्तक झाले. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत केलेल्या कामाची आठवण खडसेंनी सांगितली. त्यावेळची भाजप आणि आजची भाजप यात खूप मोठा फरक आहे. पंकजाताईंवरची आज जी वेळ आली आहे. यावरून भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना काढण्याचा आणि त्यांना संपवण्याचा घाट सुरू आहे, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे.

खडसे आणि धनंजय मुंडे भावूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि धनंजय मुंडे हे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवरती नतमस्तक झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना धनंजय मुंडे भावूक झाले होते. रात्रीपासून प्रत्येक फोटो व्हिडिओ पाहत असताना त्यांची आठवण क्षणाक्षणाला येत असल्याचे ते म्हणाले. एकनाथ खडसेदेखील आठवणी सांगताना भावूक झाले होते.

पंकजा मुंडे यांना संपवण्याचा घाट : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजप पक्षावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पक्षातून त्यांना दुय्यम प्रकारची वागणूक मिळत असल्याचा आरोपही अनेकदा विरोधी पक्षांनी केला होता. पक्षाकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीवर पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी आपल्या वेगळ्या निर्णयाचे संकेत दिले आहेत. पंकजा मुंडे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत देताच भाजपातील ज्येष्ठ नेतेमंडळी पक्षाची बाजू मांडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांची समजूत काढण्यासाठी पुढे येत असतात. गोपीनाथ गडाला एकनाथ खडसे यांनी आज भेट दिली. त्यावेळी खडसे मुंडे साहेबांच्या पुतळ्यासमोर नमतमस्तक झाले. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी धक्कादायक विधान केले. पंकजा मुंडे यांना भाजपमधून संपवण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला. आज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची भेट घेण्याआधीही खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी हे धक्कादायक विधान केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी आपले आयुष्य घातले आहे. भाजप पक्ष ज्यांनी वाढवला. बहुजनांपर्यंत पोहोचला, अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

कारखान्याच्या हितासाठी आम्ही एकत्र : एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील यावेळी उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगताना धनंजय मुंडे भावूक झाले होते. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या संदर्भात त्यांना प्रश्न करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, माझे वडील पंडितांना आणि लोकनेते मुंडे साहेब यांनी हा कारखाना घाम गाळून उभारलेला आहे. उभा केलेला होता यात सर्वांच्या आठवणी दडलेल्या आहेत आणि हा कारखाना आज कर्जाच्या खाईत बुडालेला आहे म्हणून कारखान्याच्या हितासाठी आम्ही दोघेजण एकत्रित आलो. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येत बिनविरोध 21 संचालक निवडले होते. या कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी 9 मे रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

हेही वाचा-

  1. Eknath Khadse Critics : मी सुरत अन् गुवाहाटी तपासले मात्र, मंत्री काही मिळेच ना! एकनाथ खडसेंची खोचक टीका
  2. Eknath Khadse attack on BJP : राज्यात आता 'नमो चहा विक्रेता महामंडळ' स्थापन करा; एकनाथ खडसेंचा भाजपला खोचक टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.