ETV Bharat / state

आष्टीत रंगले कविसंमेलन; आमदार सुरेश धसांनी गायले गाणे

author img

By

Published : Feb 9, 2021, 9:56 PM IST

Updated : Feb 9, 2021, 10:15 PM IST

आष्टी येथे आमदार सुरेश धस यांच्या जन्मदिन औचित्य साधून सुरेश धस मिञमंडळाच्यावतीने अव्दैतचंद्र निवासस्थानी रविवारी राञी आठ वाजता राज्यातील निमंत्रित कविंचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

ashti
ashti

आष्टी(बीड) - "पलटी होते गाडी कधी बैल जातो मरून, मुकादमाच्या बोजाखाली श्वास जातो गुदमरून, ना अपघाताची हमी कुठली, ना पॉलिसीचे कव्हर, बाईपणाच्या जगण्याला कधीच नाही बहर, ऊसतोड मजूरावर कवी इंद्रकुमार झांजे यांनी कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. ऊसतोड कामगार सध्या कसे जिवन जगतात याचे प्रतिबिंबचं या कवितेतून त्यांनी सादर केले. आष्टी येथे आमदार सुरेश धस यांच्या जन्मदिन औचित्य साधून सुरेश धस मिञमंडळाच्यावतीने अव्दैतचंद्र निवासस्थानी रविवारी राञी आठ वाजता राज्यातील निमंत्रित कविंचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

आष्टीत रंगले कविसंमेलन

या कार्यक्रमाचे अध्यक्ष खोडा व बबन चिञपटाचें गीतकार विनायक पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत प्रतिष्ठान सोनईचे अध्यक्ष प्रशांत गडाख हे होते. या कविसंमेलनात राज्यातील डी.के.शेख, प्रभाकर साळेगांवकर, मुकूंद राजपंखे, अनंत कराड, अरूण पवार, सत्यप्रेम लगड, सुरेखा खेडकर, विठ्ठल जाधव, माधव सांवत, नागेश शेलार, संगिता होळकर व इंद्रजीत झांजे या कवींनी सहभाग घेतला होता.

नजमा शेख यांनी 'छञपती शिवाजी महाराजांची राजे तुम्ही पुन्हा या', दिनेश पोकळे यांनी सध्या दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी अंदोलन, अनंत कराड यांनी केरसुणी या शिर्षकावर आणि अरूण पवार यांनी "धतुरा" या शब्दावर आपली कविता सादर केली. वात्रटिकाकार सत्यप्रेम लगड यांनी नेत्यांच्या पक्ष बदलाबद्दल टीका केली .तर माधव सावंत यांनी आई या विषयावर कविता केली. आष्टी येथे पार पडलेल्या कविसंमेलनानिमित्त आयोजित काव्य संमेलनात विविध प्रकारच्या कविता मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिष हातवटे व वि.भा.सांळूखे यांनी करून आभार मानले.

आमदार धसांनी गायले गाणे

आमदार सुरेश धस सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कोणताही कार्यक्रम असला तरी त्यात त्यांचा सहभाग असतोच. रविवारी झालेल्या कविसंमेलनात आमदार धसांनी हम तुम्हे चाहते है इतना! या गाण्यावर ठेका धरला.

Last Updated : Feb 9, 2021, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.