ETV Bharat / state

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या खासदार राजेंद्र गावितांविरोधात जोडो मारो आंदोलन - MP Rajendra Gavit

शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित ( Shinde Group MP Rajendra Gavit ) यांनी धनगर समाजाला आरक्षण ( Dhangar reservation ) मिळणार नाही असे म्हटले होते. त्यावर धनगर समाज आक्रमक झाला असून राजेंद्र गावित यांचा निषेध करण्यात येत आहे. आज बीडमध्ये खासदार राजेंद्र गावित ( MP Rajendra Gavit ) यांच्या विरोधात धनगर समाजाने जोडो मारो आंदोलन केले.

Dhangar Reservation
खासदार राजेंद्र गावित विरोधात जोडो मारो आंदोलन
author img

By

Published : Dec 26, 2022, 10:58 PM IST

खासदार राजेंद्र गावित विरोधात जोडो मारो आंदोलन

बीड - धनगर समाज गेल्या अनेक वर्षापासून हा एसटी (ST) प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे, परंतु काही चुकीच्या शब्द उच्चारामुळे समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या आरक्षण प्रश्नावर संसदेत खा. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी धनगर आरक्षणाची ( Dhangar reservation ) अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न सभागृहात विचारला होता. त्यावर धनगर आरक्षणाला मिळणार नाही असे शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित ( Shinde Group MP Rajendra Gavit ) यांनी म्हटले होते. त्याविरोधात धनगर समाजाच्या वतीने राजेंद्र गावित ( MP Rajendra Gavit ) यांच्या फोटोला बीडमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

गावित यांच्या विरोधात तीव्र आंदोलन - धनगर समाज हा सातत्याने गेले अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून फडणवीस, शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यांचाच शिंदे गटाचा खासदार राजेंद्र गावित यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा संसदेमध्ये त्यांनी उल्लेख केला होता. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज हा राजेंद्र गावित यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करत आहे असे आंदोलनकर्ते म्हणाले.

धनगर समाजाचा सरकारला इशारा - भाजप सरकारला मला इशारा द्यायचा आहे की, येणाऱ्या काळात धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही किंवा त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मंत्र्याला महाराष्ट्रभर धनगर समाज फिरू देणार नाही. तसेच धनगर समाज त्यांच्या घरात मेंढरं सोडल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाच्या वतीने आम्ही राजेंद्र गावित यांचा जाहीर निषेध करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.