ETV Bharat / state

बीडमध्ये सराफ दुकान पेटविले; दृश्य 'सीसीटीव्ही'मध्ये कैद - बीडमध्ये सराफ दुकान पेटविले

बीड शहरातील हिरालाल चौकात एका सराफा दुकानाला आग लावल्याचा प्रकार शनिवारी पहाटे 5 वाजता घडला. विशेष म्हणजे दुकान पेटवितानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Jewelers shop was set on fire in Beed
Jewelers shop was set on fire in Beed
author img

By

Published : May 29, 2021, 3:48 PM IST

बीड - शहरातील हिरालाल चौकात एका सराफा दुकानाला आग लावल्याचा प्रकार शनिवारी पहाटे 5 वाजता घडला. विशेष म्हणजे दुकान पेटवितानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून पेट बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.

सराफ दुकान पेटवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड येथील सुहास गणेशराव बेदरे यांचे हिरालाल चौक परिसरात सराफा दुकान आहे. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या दुकानाला आग लावण्यात आली. दुकानाच्या शटरने पेट घेतला. आगीचे लोट पाहून नागरिकांनी धाव घेतली. आग विझवण्यात नागरिकांना यश आले. दरम्यान, जागेच्या वादातून ही आग लावली असल्याचा संशय देखील सांगितला जात आहे. विशेष म्हणजे आग लावतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून पेट बीड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. पोलीस निरीक्षक सतीश वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग वेळीच नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.