ETV Bharat / state

बीडची जनता हीच माझ्यासाठी दैवत - जयदत्त क्षीरसागर - BJP

बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्तीप्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. ही रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली.

जयदत्त क्षीरसागर
author img

By

Published : Oct 3, 2019, 11:45 PM IST

बीड - शिवसैनिकांचा कडवा विरोध मी अनुभवला आहे. त्याच शिवसैनिकांची मायेची उब आज मी अनुभवत आहे. जिवाचे रान करणाऱ्या शिवसैनिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचे बळ देते. माझा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असणार आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी आज अर्ज दाखल केला आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असे वक्तव्य जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्तिप्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. ही रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली.

हेही वाचा - पंकजा मुंडेंचे भव्य शक्तिप्रदर्शन; परळीतून उमेदवारी अर्ज दाखल

यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिक उघड वार करत असतो. छुपा वार तो करत नाही. मला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, याची खात्री आहे. माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. समोर बसलेल्या जनसागराची 5 वर्षे सालगडी म्हणून काम करणार आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली.

ते लोकांचे घर फोडायला निघाले होते. त्यांची घराची काय अवस्था झाली, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, अशी टीकाही क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर केली. परळीपासून बीडपर्यंत आणि बीडपासून मुंबईपर्यंत फोडाफोडी करणाऱ्यांची कशी फोडाफोडी झाली. शेवटी जे पेराले तेच उगवते, हेच नियतीने दाखऊन दिले आहे. माझ आणि जनतेचे नात विकासाचे आहे. ते अधिक दृढ आणि बळकट होत आहे, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी महादेव जानकरांनी केले पंकजा मुंडेंचे औक्षण

यावेळी शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख वुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबुरेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्ही आमदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात - खोतकर

बीडकरांनो, तुम्ही या निवडणुकीत एक आमदार नाही, तर जयदत्त क्षीरसागरांसारखा विकासाची दृष्टी असणारा प्रबळ नेता निवडून देत आहात. म्हणजेच मंत्री निवडून देत आहात. त्यांचा विजय किर्तीमान विजय असणार आहे, हे मी खात्रीने सांगतो, असे शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

हेही वाचा - माझी लढाई परळीचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी - धनंजय मुंडे

Intro:

बीडची जनता माझ्यासाठी दैवत;
भाऊक जयदत्त क्षीरसागर जनसागरासमोर झाले नतमस्तक

बीड- शिवसैनिकांचा कडवा विरोध मी अनुभवला आहे. त्याच शिवसैनिकांची मायेची उब आज मी अनुभवत आहे. जिवाचे रान करणा-या शिवसैनिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देते. माझा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असणार आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी आज अर्ज दाखल केला आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशिर्वाद मागितले.

बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. भगवा हातात घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण शहर आज दणाणून गेले होते. रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली. उपस्थित हजारो मतदारांसमोर बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देऊन जाते. त्यांचा कडवा विरोध मी बघितला आहे आणि त्यांचे उबदार प्रेमही मी अनुभवले आहे. शिवसैनिक उघड वार करत असतो. छुपा वार तो करत नाही. मला माझ्या मोठ्या मताधिक्याने विजयाची खात्री आहे. माझ्यासाठी अहोरात्र झटणाNया तमाम शिवसैनिकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. समोर बसलेल्या जनसागराची पाच वर्षे सालगडी म्हणून काम करणार आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका करताना जयदत्त क्षीरसागरांनी पुढे म्हटले ते लोकांचे घर फोडायला निघाले होते. त्यांची घराची काय अवस्था झाली उभ्या महाराष्ट्राने त्यांची नाटके टिव्हीवर बघितली. परळीपासून बीडपर्यंत आणि बीडपासून मुंबईपर्यंत फोडाफोडी करणा-यांची कशी फोडाफोडी झाली. शेवटी जे पेराला ते उगवतं हेच नियतीने दाखऊन दिलं आहे. माझं आणि जनतेचं नातं हे विकासाचं नातं आहे. ते अधिक दृढ आणि बळकट होत आहे. देशात आणि राज्यात विकासाची लहर सुरू झाली आहे. लोकांना विकास हवाय. जातीपातीचं राजकारण नकोय, गेल्या पाच वर्षात युतीच्या सरकारने विकासाचा महामेरू उभाकेला आहे. पुन्हा युतीचेच सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. भगवा ध्वज विधीमंडळावर फडकणार आहे. भावी काळ आपला असेल. दुष्काळाची झळा सोसलेल्या मराठवाड्याच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंप आपल्याला पुसायचा आहे. मी आज मत मागतोय ते व्हिजन करता. पुढच्या पिढीकरीता, आमची सत्ता ही तुमच्या भविष्यासाठी असणार आहे. असा शब्द मी देतो असे जयदत्त क्षीरसागरांनी ठासून सांगितले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख वुंâडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सहसंपर्वâप्रमुख बाळासाहेब आंबुरे, संपदाताई गडकरी,संगीता चव्हाण, चंद्रकला बांगर, जयिंसगमामा चुंगडे, हनुमान पिंगळे, सर्जेराव तांदळे, डॉ योगेश क्षीरसागर,जगदीश काळे,अरुण डाके ,अरुण बॉंगाणे,दिलीप गोरे, गणपत डोईफोडे,नितीन धांडे,बंडू पिंगळे,सागर बहिर,संजय महाद्वार, सुनील सुरवसे,किशोर काळे,विकास जोगदंड, माणिक वाघमारे,बाप्पासाहेब घुगे,झुंजार धांडे,शेषराव फावडे,यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ योगेश क्षीरसागर यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले.

तुम्ही आमदार नव्हे तर मंत्री
निवडून देत आहात-खोतकर

बीडकरांनो तुम्ही या निवडणुकीत एक आमदार नाही तर ना जयदत्त क्षीरसागरांसारखा विकासाची दृष्टी असणारा प्रबळ नेता निवडून देत आहात, म्हणजेच मंत्री निवडून देत आहात, त्यांचा विजय किर्तीमान विजय असणार आहे हे मी खात्रीने सांगतो. स्व.केशरकावूâ क्षीरसागरांचा वारसा त्यांनी मोठ्या हिंमतीने चालवला. एक अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या जाळ्यातून येथील लोकांना रोजगार मिळवून दिला. हा ढाण्या वाघ आज उमेदवारी अर्ज दाखल करून आला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा हाच संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करून बीडचा गड आपल्या राखायचा आहे असे आवाहन शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.