ETV Bharat / state
नियती कोणाला माफ करत नसते; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल - BJP
राष्ट्रवादीचे किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत. नियती कोणाला माफ करत नसते, असा हल्लाबोल राष्ट्रवादीवर जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.
जयदत्त क्षीरसागर
By
Published : Oct 1, 2019, 10:58 PM IST
बीड - शिवसेनेत आल्यापासून मनस्वी आनंद होत आहे. आपले सर्व कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत. तिकडे उलटे चित्र पाहण्यास मिळत आहे. सगळी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत, शिल्लक कोणी राहिले का हे तपासले जात आहे, महायुती होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु नियती कोणाला माफ करत नसते, असा हल्लाबोल राष्ट्रवादीवर जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.
हेही वाचा - अप्रत्यक्ष भाजपला मदत करणारे प्रत्यक्ष मदतीसाठी भाजपात गेले -धनंजय मुंडे
क्षीरसागर म्हणाले, महायुतीचा निर्णय झाला, आता महायुतीचेच सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. आदित्य ठाकरे निवडणुकीत उतरल्याने मोठा उत्साह संचारला आहे. मंत्रालयाचा सहावा मजला त्यांची वाट पाहत आहे. बीड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गुरूवारी सकाळी अकरा वाजता भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अनुषंगाने आज (मंगळवार) पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले.
हेही वाचा - 'आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार?'
यावेळी जयदत्त क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले, आता आपल्याला महाराष्ट्र आणि तहानलेला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. शिवसेनेने मला प्रवेश दिला. मंत्रीपद दिले, आता उमेदवारीही दिली. कमी षटकात जास्त धावा करण्याचे काम आपल्याकडे दोन महिन्यात झाले.
हेही वाचा - अखेर मुंदडा कुटुंबीय भाजपात दाखल; केजमध्ये संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले?
यावेळी जिल्हाप्रमुख कूंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - परळीत 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या करा; मुंडेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणूक असेल
जयदत्त क्षीरसागरांनी आता हाती धनुष्यबाण घेतले आहे. गळ्यात भगवा आणि हातात विजयी ध्वज घेऊन गुरूवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसैनिकांनी ताकदीने यायचे. परिवर्तन घडवून आणायचे आहे. भागा भागात, वाडी वस्तीत, गावा-गावात काम करायचे आहे, हेवे दावे विसरायचे आहेत. उज्वल भविष्य आपली वाट पाहतंय, जयदत्त क्षीरसागरांच्या मताधिक्याचा दरारा निर्माण झाला पाहिजे, ही भगवी ताकद गुरूवारी दाखऊन द्यायची आहे, ती ताकद अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणुकीची असेल असा आशावाद शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी व्यक्त केला.

Intro:नियती कोणाला माफ करत नसते; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
बीड- शिवसेनेत आल्यापासून मनस्वी आनंद होत आहे, आपले सर्व कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत, तिकडे उलटे चित्र पाहण्यास मिळत आहे, सगळी गळती लागली आहे, किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत, शिल्लक कोणी राहिले का हे तपासल्या जात आहे, महायुती होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते, राष्ट्रवादीवर असा हल्लाबोल करत ना.क्षीरसागर म्हणाले महायुतीचा निर्णय झाला, आता महायुतीचेच सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे, ठाकरे कुटुंबात इतिहास घडत आहेत, आदित्य ठाकरे निवडणुकीत उतरल्याने मोठा उत्साह संचारला आहे, मंत्रालयाचा सहावा मजला त्यांची वाट पाहत आहे असे ना जयदत्त क्षीरसागरानी म्हटले आहे.
बीड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गुरूवारी सकाळी अकरा वाजता भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, या अनुषंगाने आज पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले, यावेळी ना जयदत्त क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले, आता आपण सगळे एक झालो आहोत, विकास हेच आपले नाते, विकास हाच आपला जवळीकतेचा धागा आहे, आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचे आहे. हा महाराष्ट्र आणि तहानलेला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे, शिवसेनेने मला प्रवेश दिला, मंत्रीपद दिले, आता उमेदवारीही दिली, कमी षटकात जास्त धावा करण्याचे काम आपल्याकडे दोन महिन्यात झाले, आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे पाहिले ठाकरे आहेत, राज्यात उत्साह संचारला आहे, मंत्रालयातील सहावा मजला त्यांची वाट पाहतोय असे म्हणत क्षीरसागरांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. ते आपल्या भाषणात म्हणाले नियती कोणाला माफ करत नसते, पेपर आला सिंचनाचा अन् उत्तर द्यावे लागले बँकेचे, उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो, अनैतिकतेने वागलात त्याची परतफेड करावीच लागेल, अजूनही पक्ष प्रवेश थांबायला तयार नाहीत, शिल्लक कोणी राहते का हे बघण्याची वेळ आली आहे, आपली इच्छा नाही कोणाचे वाईट व्हावे, सगळे गुण्या-गोविंदाने राहावे, कोणी कोणाच्या ताटात मिठाचा खडा टाकू नये हिच आपली भावना असते, जाऊ द्या आपण आपला धनुष्यबाण हाती घेतला आहे, जनसेवा आणि समाजसेवा करत शिवसेनाप्रमुख यांची शिकवण पूर्ण करायची आहे असे ते म्हणाले. तत्पूर्वी आपल्या भाषणात जिल्हाप्रमुख कूंडलिक खांडे यांनी वज्रमुठ आवळून प्रचाराला लागण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले की शिवसैनिकांचे परिश्रम, त्याग मतदारसंघ बांधून ठेवण्याच्या कामाला आले. राष्ट्रवादीची अधोगती सुरू झाली आहे. शिवसैनिकांनी कामाला लागायचे आहे. तरूणांची फौज शिवसेनेच्या पाठीमागे खंबीर उभी आहे. मोठ्या मानाने भगवा फडकावयाचा आहे असे ते म्हणाले. बाळासाहेब पिंगळे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणायचे आहे. विकासाची गंगा आणण्याचे काम त्यांनी केले आहे. चिंता करू नका, शिवसैनिक गाफील बसणार नाही, मतदारांनो तुम्हीही भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर, विलास महाराज शिंदे, सागर बहीर, वैजीनाथ तांदळे, बाळासाहेब आंबुरे, जयसिंग चुंगडे, नितीन धांडे, अरुण बोंगाणे, दिलीप भोसले, महिला जिल्हा संघटक संगिताताई चव्हाण, चंद्रकला बांगर, सारिका काळे, उर्मिला थोरात, अल्काताई डावकर, विलास बडगे, दिलीप गोरे, संजय महाद्वार, अरूण डाके, गणपत डोईफोडे, दिनकर कदम, शिवाजी जाधव, झुंजार धांडे, रतन गुजर, गोरख सिंगण, शेख खालेद, रत्नाकर शिंदे, किसन कदम, राजू काळे, आशिष काळे, शुभम कातांगळे, सखाराम मस्के, सुनिल सुरवसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किशोर काळे यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक शिराळे, बंडे शिंदे, किरण बेद्रे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर ना.जयदत्त क्षीरसागर, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांनी पक्षात प्रेवश केल्याबद्दल स्वागत केले.
राष्ट्रवादीची श्रेष्ठी क्षीरसागरांना छोटे समजत होते. हिनतेने वागवत होते. खूप त्रास दिला. बीडकरांच्या नादी कशाला लागताय, जैशी करणी वैसी भरणी, आता रडायला लागले आहेत. उमेदवार्या जाहीर करूनही कोणी राष्ट्रवादीत थांबायला तयार नाहीत. किती लाजिरवाणी बाब आहे. कशाचे हो हे राष्ट्रीय नेते? राष्ट्रवादीचं आता अस्तित्वच संपलंय असा घणाघाती आरोप करत गुरूवारी शिवसैनिकांचा उत्साह बीडच्या रस्त्या रस्त्यावर दिसेल असा विश्वास नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणूक असेल-
जयदत्त क्षीरसागरांनी आता हाती धनुष्यबाण घेतले आहे. गळ्यात भगवा आणि हातात विजयी ध्वज घेऊन गुरूवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसैनिकांनी ताकदीने यायचं. परिवर्तन घडऊन आणायचं आहे. भागा भागात, वाडी वस्तीत, गावा-गावात काम करायचं आहे, हेवे दावे विसरायचे आहेत. उज्वल भविष्य आपली वाट पाहतंय, जयदत्त क्षीरसागरांच्या मताधिक्याचा दरारा निर्माण झाला पाहिजे, ही भगवी ताकद गुरूवारी दाखऊन द्यायची आहे, ती ताकद अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणुकीची असेल असा आशावाद शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी व्यक्त केला.Body:बConclusion:ब