बीड: बीडचा इतिहास जो आहे तो अत्यंत पुरातन आहे. या ठिकाणी चंपावती राणीने राज्य केले होते म्हणून याला चंपावती नगरी म्हणून संबोधले जाते. तर पुरातन काळी लोखंड सापडत असायचे आणि याच लोखंडामुळे त्याला भीड नाव पडले. याच्यावरून पुढे बीड असे नाव झाले. रामायणाशी मिळता जुळता असल्यामुळे या ठिकाणी अनेक मंदिरे पुरातन काळातील आहेत. अनेक मंदिराची बांधकामे हे रामायण काळातील आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक राजे महाराजे येऊन गेले. तसेच श्रीरामप्रभू सुद्धा येऊन गेले असल्याच्या खुणा आजही या ठिकाणी निदर्शनास येत आहेत.
बिंदुसरा नदीच्या तीरावर मंदिर: जटाशंकर मंदिर हे एक अतिप्राचीन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हे अकराव्या शतकातील आहे. याचा इतिहास म्हणजे हे मंदिर बिंदुसरा नदीच्या तीरावर आहे. नदीच्या तीरावरील जटाशंकर मंदिर आहे. शिलालेख जो आहे तो अत्यंत पुरातन आणि दर्शनी भागात प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला आहे. हे एका गल्लीमध्ये असल्यामुळे विकासापासून वंचित आहे. तिर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यातील विविध मंदिरांचा जसा जिर्णोद्धार झालेला आहे. पुरातन खात्याचे या मंदिराकडे दुर्लक्ष असल्यामुळे या मंदिराचा विकास खुंटला आहे.
मंदिराची आख्यायिका: बीड जिल्हा हा पूर्वी दंडक आरण्य म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी घनदाट जंगल आहेत. ज्यावेळेस रावणाने सीतेचे हरण केले त्यावेळेस लंकेकडे घेऊन जाता वेळेस या ठिकाणी रावणाची आणि जटायू पक्षाचे युद्ध लागले होते. त्यावेळेस रावणाने जटायू पक्षाचे पंख कापून टाकले. मात्र श्रीराम प्रभू येईपर्यंत जटायू पक्षाने आपला प्राण ठेवला. व सांगितले की रावण सीतेला लंकेकडे घेऊन गेलेला आहे. त्यानंतर श्रीराम प्रभूचे दर्शन घेऊन जटायू पक्षी अनंतात विलीन झाले. म्हणून या ठिकाणाला जटाशंकर असे म्हणतात. शंकर मंदिर हे रामायण काळातील असून अति पुरातन मंदिर आहे. रामायण काळातील असल्यामुळे रामायणाशी याचा संबंध येतो, म्हणून या मंदिराला जटाशंकर मंदिर असे म्हणतात.
महाशिवरात्रीला यात्रा भरते: या ठिकाणी रावणाचे आणि पक्षाचे युद्ध झाले आणि त्यामध्ये जटायूला मारले गेले. ज्या वेळेस रावण सीतेला घेऊन लंकेकडे जात होता त्यावेळेस या ठिकाणी रावणाचा आणि जटायू च युद्ध झाले आणि त्यामध्ये जटायू पक्षाला मरण आले. त्यामुळे याला जटाशंकर असं नाव पडले आहे. या ठिकाणी दररोज पूजा आरती होते. विशेष म्हणजे महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते सोमवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते.
हेही वाचा: panchaleshwar Aatmatirth Mandir जगाच्या पाठीवरचे श्री दत्तात्रय प्रभू यांचे भोजन स्थान वाचा श्री दत्तात्रेय प्रभूंची आख्यायिका