बीड : इंस्टाग्रामवर ओळख झाली (Identity and harassment on Instagram) आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्रीतून त्या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून अत्याचार करत तिच्याकडून पैशाची मागणी करत ब्लॅकमेलिंग (blackmailing girl for money) केले. या तरुणीने पैसे न दिल्यामुळे तिचे अश्लील फोटो 50 लोकांना पाठवले. त्यामुळे तिची बदनामी (defaming a girl) झाली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी व्यक्तीविरुद्ध ऑक्टोबर रोजी विनयभंग, बलात्कार (rape case filed), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Latest news from Beed, Beed Crime
लॉजवर नेऊन बनविला अश्लील व्हिडीओ- पिढीतेची ओळख 2020 मध्ये झाली होती. ओळख झाल्यानंतर ते व्हाट्सअपवरही एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवून तिला पुण्यात बोलावले. तिला एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. तिथे तिचा अश्लील व्हिडिओ बनवला व अश्लील फोटोही काढले. त्याआधारे नंतर त्याने ब्लॅकमेलिंग सुरू केली. सध्या जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे जग अगदी जवळ आले आहे. एका क्लिकवर संपूर्ण जगाची माहिती घरबसल्या मिळत आहे अनेक तरुण सोशल मीडियाच्या वापर चांगल्या प्रकारे करत आहेत तर काही सोशल मीडियाचा गैरवापर ही तितकाच करताना पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियाचा चुकीचा वापर- सध्या व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. याच्या माध्यमातून अनेक लोक जोडले जात आहेत. त्यामुळे अनेक लोक याचा चांगलाही वापर करताना पाहायला मिळतात; परंतु काही त्याचा गैरवापर करून अनेकांना फसवण्याचे प्रकारही जिल्ह्यासह राज्यांमध्ये व देशांमध्ये पाहायला मिळत आहेत. याच माध्यमातून अश्लील फोटो काढणे व त्या व्यक्तीला ब्लॅकमेलिंग करणे असेही प्रकार आपण अनेक वेळा पाहिले आहेत. त्यामुळे अशा प्रकाराला बळी न पडता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आव्हान शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक केतन राठोड हे करत आहेत.