ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात कपाशीवर बोंड आळीचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

author img

By

Published : Nov 25, 2019, 12:23 PM IST

अवेळी झालेला पाऊस वातावरणातील अतिरिक्त आद्रतेमुळे गुलाबी बोंड आळी वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी कपाशीचे दुबार पीक घेण्याचे टाळावे आणि जमीनीच्या ओलीचा फायदा घेत वेळेतच कपाशी काढून हरभरा, गहू पेरणी करावी, अशी सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात कपाशीवर बोंड आळीचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहान

बीड - जिल्ह्यात दिंद्रुड नित्रुड गंगामसला महसूल मंडळातील गावातील शिवार पाहणी दरम्यान कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. उशिरा आलेल्या बोंड अळीमुळे दुबार घेतलेल्या कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात कपाशीवर बोंड आळीचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहान

हेही वाचा - राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य नाही; बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या कालावधीवर शंकेला वाव

गेल्या वर्षी कृषी विभागाच्या जन जागृतीमुळे शेतकऱ्यांनी तात्काळ कीटकनाशकाच्या फवारणी करावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे बोंड अळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला नव्हता. यावर्षी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि फवारणीमुळे सुरुवातीच्या काळात बोंड आळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. परंतु अवेळी झालेला पाऊस वातावरणातील अतिरिक्त आद्रतेमुळे गुलाबी बोंड आळी वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी कपाशीचे दुबार पीक घेण्याचे टाळावे आणि जमीनीच्या ओलीचा फायदा घेत वेळेतच कपाशी काढून हरभरा, गहू पेरणी करावी, अशी सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार

कमी प्रादुर्भाव आणि अपेक्षित बोंडे आणि पानांची संख्या असलेल्या कापसावर वेळीच उपाय योजना कराव्यात, असे आवाहन कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी केले आहे.

अशी करावी फवारणी -

  • 5% प्रादुर्भाव असल्यासअझॅरडिक्टीन १.१५ % ५० मिली
  • अझॅरडिक्टीन ०.३० % ४० मिली
  • क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली
  • प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली

५ ते १० % प्रादुर्भाव असल्यास

  • थायोडिकार्ब ७५ Wp
  • थॉमेथॉक्झान १२.६ % आणि लॅबडा साहलोथ्रीन ९५ %

वरील प्रमाण दहा लिटर पाण्यात साध्या पंपासाठी आहे. पेट्रोलसाठी हे प्रमाण तिप्पट करावे.

Intro:बीड जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे अवाहान

बीड- जिल्ह्यात दिंद्रुड नित्रुड गंगामसला महसूल मंडळातील गावातील शिवार पाहणी दरम्यान कापूस पिकावर गुलाबी बोन्ड अळी चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. उशिरा आलेल्या बोंड आळी मुळे फरदड अथवा पुन:बहार घेण्यात येणाऱ्या कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांनी तात्काळ कीटकनाशकाच्या फवारणी करावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात येतेय. यामुळे बोंडअळी आटोक्यात राहिली. यावर्षी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय योजना व फवारणी मुळे सुरुवातीच्या काळात बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. परंतु अवेळी झालेला पाऊस वातावरणातील अतिरिक्त आद्रतेमुळे गुलाबी बोंड आळी वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे व जमीनीच्या ओलीचा फायदा घेत वेळेतच कपाशी काढून हरभरा, गहू पेरणी करावी अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
कमी प्रादुर्भाव व अपेक्षित बोंडे व पाते संख्या असलेल्या कापसावर वेळीच उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी केले आहे.

अशी करावी फवारणी-

5% प्रादुर्भाव असल्यास,
अझॅरडिक्टीन 0.15% 50 मिली
अझॅरडिक्टीन 0.30% 40 मिली
क्विनाॅलफाॅस 25 ईसी 20 मिली
प्रोफेनोफाॅस 50 ईसी 20 मिली
5-10% प्रादुर्भाव असल्यास,
थायोडिकार्ब 75 Wp
थाॅमेथॉक्झान 12.6%+ लॅंबडा साहलोथ्रीन95%
वरील प्रमाण दहा लिटर पाण्यात साध्या पंपासाठी आहे पेट्रोलसाठी हे प्रमाण तिप्पट करावे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.