ETV Bharat / state

Three Suicide : एकाच दिवशी तिघांची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील घटना - आर्थिकव व्यवहारातून आत्महत्या

बीडमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांपैकी एक शिक्षक आहे, एक तरुण तर एकाने आर्थिक व्यवहारातील जाचास कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

three people committed suicide on the same day
एकाच दिवशी तिघांची आत्महत्या
author img

By

Published : Feb 24, 2022, 9:49 PM IST

बीड - जिल्ह्यात २४ तासांत शिक्षक, तरुण आणि एका व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या ( three people committed suicide ) केल्याची घटना घडली आहे. या तिन्ही घटना माजलगाव तालुक्यातील असल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पहिली घटना, शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथील सुरेश रामकिसन बडे ( वय ३७, रा.गावंदरा ता.धारूर ) या शिक्षकाने गुरुवारी पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी नैराश्यातून घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या घटनेची माहिती माजलगाव शहर पोलिसात दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे.

three people committed suicide on the same day
एकाच दिवशी तिघांची आत्महत्या
दुसरी घटना, राजेवाडी येथे कृष्णा बाळासाहेब कोके (वय १९) या युवकाने अज्ञात कारणावरून बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
In Beed, three people committed suicide on the same day
एकाच दिवशी तिघांची आत्महत्या
तिसरी घटना, राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय ४०) या व्यक्तीने व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Nawab Malik : नवाब मलिक यांना न्यायालयाचा दिलासा.. आता ईडीच्या कोठडीत मिळणार 'या' सुविधा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.