ETV Bharat / state

बीडमध्ये पत्नीचा खून करून पती स्वतः हून ठाण्यात हजर; कारण अस्पष्ट

author img

By

Published : May 29, 2020, 9:54 PM IST

ही घटना बीड शहर ठाण्याच्या हद्दीत जालना रस्ता येथे घडली असून आरोपी पती रमेश मस्के खून केल्यानंतर स्वतःहूनच बीड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

बीड पोलीस
बीड पोलीस

बीड - जालना रस्ता परिसरात पत्नीचा पतीनेच तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. उर्मिला रमेश मस्के (वय 35, रा. मंत्री गल्ली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

ही घटना बीड शहर ठाण्याच्या हद्दीत जालना रस्ता येथे घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार खून झालेल्या महिलेचे माहेर बीड तालुक्यातील खांडेपारगाव आहे. आरोपी रमेश मस्के खून केल्यानंतर स्वतः हूनच बीड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. खुनाची घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय काबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. पुढील तपास बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. मागील आठवड्याभरातील बीड शहरात खुनाची ही दुसरी घटना आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.