ETV Bharat / technology

सॅमसंगनं नोटीस बजावल्यानंतर काही कामगार कामावर परतले - Samsung workers strike Chennai - SAMSUNG WORKERS STRIKE CHENNAI

Samsung workers strike : सॅमसंग प्लांटमधील कामगारांचा संपामुपळं इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळं कंपनीनं कारणं दाखवा नोटीस बजावल्यानंतर काही कामगारांनी कामावर परतणे सुरू केलं आहे.

Samsung
सॅमसंग (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 24, 2024, 1:13 PM IST

चेन्नई Samsung workers strike : सॅमसंग इंडियाच्या चेन्नई प्लांटमधील कामगारांचा संप 16 व्या दिवशी देखील सुरूच आहे. त्यामुळं कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळं कंपनीनं संपावर असलेल्या कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर काही कामगारांनी कामावर परतण्यास सुरवात केलीय.

'नो वर्क, नो पे' : सॅमसंगनं कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून कामगारांनी कामावर न परतल्यास त्यांचं वेतन थांबवलं जाणार असल्याचं म्हटलं होतं. कारणे दाखवा नोटीसनुसार, बेकायदेशीर संपाच्या कालावधीसाठी कामगारांना 'नो वर्क, नो पे' धोरणानुसार वेतन दिलं जाणार नाही, असं कंपनीचं म्हणणे आहे.

सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा : "कंपनी व्यवस्थापनानं चर्चा करून सर्व समस्या सोडवल्या जाऊ शकतात, असं म्हटलय. कंपनी तसंच कामगारातील मतभेद दूर करण्यासाठी सामंजस्यपूर्ण प्रयत्न केल्याचं सॅमसंगनं म्हटलं आहे". कामगारांनी बेकायदेशीर संप सुरू ठेवल्यास तसंच त्यांनी कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय.

कामगारांना कारणं दाखवा नोटीस : "ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 4 दिवसांच्या आत कामावर हजर होण्यास विनंती केलीय. ...अन्यथा कामगारांना नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत तुम्हाला सेवेतून का बडतर्फ केलं जाऊ नये, याचे कारण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," त्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

कामगार 9 सप्टेंबरपासून संपावर : एका वृत्तानुसार, वेतनवाढ, युनियन मान्यता तसंच 8 तासाच्या कामसह आदी मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक हजारांहून अधिक सॅमसंग कामगार 9 सप्टेंबरपासून संपावर आहेत. सॅमसंगच्या चेन्नई कारखान्यावर सुरू असलेल्या संपाचा आता १५ व्या दिवशी, सुरुवातीला टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम झाला.

"आमच्या कामगारांचं कल्याण, हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या कोणत्याही तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यात तयार आहोत. यामुळं सणासुदीच्या आधी आमच्या ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही." - सॅमसंग

दरम्यान, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयू) तामिळनाडूनं सांगितलं की, पोलिसांनी कंपनीजवळ संप करण्यास मनाई केल्यास आम्ही कामगार न्यायालयात जावू.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.