ETV Bharat / state

धक्कादायक... डोळा फोडून कापला ओठ, बीडमध्ये पतीने गळा चिरून केली पत्नीची हत्या - beed murder

पतीने पत्नीचा अगोदर डोळा फोडला, मग ओट कापले नंतर गळा कापून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथे घडली.

मृत नेहा पठाण
मृत नेहा पठाण
author img

By

Published : Nov 26, 2019, 10:19 AM IST

बीड - माणुसकीला काळीमा फासणारी व क्रूरतेची परीसीमा गाठणारी घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील सिरसाळा येथे घडली आहे. नराधम पतीने पत्नीचा अगोदर डोळा फोडला मग ओट कापले नंतर गळा कापून तिची हत्या केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेहा सिराज पठाण (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे, तर सिराज अय्युब पठाण, असे पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिराज पठाण हा शेती व विट मजुरीचे काम करतो. सोमवारी (दि. 25 नोव्हें) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सिराज हा कामावरून घरी आला त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत पत्नी नेहाचा एक ओठ तोडला, डावा डोळा फोडला व नंतर गळा चिरून ठार मारले. नंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव पती करत होता. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच खून केल्याचे कबूल केल्याचे समजते आहे.

पोलिसांनी पती सिराज, दोन दिर, व सासू यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मृतास शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठवले आहे. पत्नीचा क्रूरतेने खून करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचा - पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव, 24 तासात पती ताब्यात

Intro:पतीने केली पत्नीची क्रुर हत्त्या; आधी फोडला
डोळा, मग ओठ अन पुन्हा कापला गळा
बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील घटना

बीड- माणुसकीला काळीमा फासणारी व क्रूरतेने पत्नीची हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये सिरसाळा येथे घडली आहे. त्या नराधम पतीने पत्नीचा अगोदर डोळा फोडला मग ओट कापले नंतर गळा कापून तिची हत्या केली. या घटनेमुळे बीड जिल्हयात खळबळ उडाली आहे.

नेहा सिराज पठान(वय२६) असे मृत महिलेचे नाव आहे. पती चे नाव सिराज अय्युब पठान आहे. समजलेल्या माहिती नुसार पती सिराज पठान शेती व विट मजूरीचे काम करतो. सोमवार दिनांक २५ रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान कामावरुन सिराज घरी आला व पत्नी ला मारहान करण्यास सुरुवात केली. मारहान करत पत्नी नेहाचा एक ओठ तोडला, डावा डोळा फोडला, व नंतर गळा चिरुन जिवे मारले. नंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव पती करत होता. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच खुन केल्याचे कबुल केल्याचे समजते आहे.

पोलिसांनी पती सिराज, दोन दिर, व सासु यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. प्रेतास शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठवले आहे. पत्नीचा क्रूरतेने खून करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.