ETV Bharat / state

आदर्श! हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र येत साजरा केला शिवजन्मोत्सव - beed

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज बीड शहरात रॅली काढण्यात आली. यामध्ये मराठा बांधवांसह मुस्लीम बांधवांनीही यात सहभाग नोंदवला.

शिवजन्मोत्सव
author img

By

Published : Feb 19, 2019, 8:20 PM IST

बीड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज बीड शहरात रॅली काढण्यात आली. यामध्ये मराठा बांधवांसह मुस्लीम बांधवांनीही यात सहभाग नोंदवला. एवढेच नाही, तर उर्दू शाळेच्या मुस्लीम विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वेगवेगळे देखावे सादर केले. विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंतीच्या रॅलीमध्ये महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

बीडची शिवजयंती मिरवणूक सबंध महाराष्ट्रासाठी जातीभेद करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी व प्रेरणादायी ठरत आहे. बीड शहरातील सह्योग नगर भागातून आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत निघाली. या मिरवणुकीत सर्व संघटना व पक्षाचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते.

बीड शहरातील मदरसा व उर्दू माध्यमाच्या शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व माँ जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून सबंध महाराष्ट्राला एकतेचा संदेश दिला. आज सकाळपासूनच शिवजयंतीच्या निमित्ताने सगळीकडे आनंदी वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळाले. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांच्याच हातात भगव्या पताका लक्ष वेधत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर केले. मिरवणूकीत लेझीम, झांज पथक मुख्य आकर्षण ठरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीचा समारोप माँ जिजाऊ वंदना देत करण्यात आला.

undefined

Intro:बीडची शिवजयंती ठरते महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक; हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक जाणवले बीडच्या शिवजयंती; उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले विविध देखावे

बीड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीड येथे मंगळवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये मराठा बांधवांसह मुस्लिम बांधवांनी देखील मोठा सहभाग नोंदवला. एवढेच नाही तर उर्दू शाळेच्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वेगवेगळे देखावे देखील सादर केले. यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंतीच्या रॅलीमध्ये महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. जातिभेद करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी बीडची शिवजयंती मिरवणूक सबंध महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Body:बीड शहरातील सह्योग नगर भागातून मंगळवारी सकाळी आठ वाजता श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत निघाली. या मिरवणुकीत सर्व संघटना व पक्षाचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. बीड शहरातील मुस्लिम बहुल भागातून ही मिरवणूक जीवा निघाली तेव्हा मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. इतिहासात पहिल्यांदाच हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 'याच देहि याच डोळा' पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला. बीड शहरातील मदरसा व उर्दू माध्यमाच्या शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व मा जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून सबंध महाराष्ट्राला एकतेचा संदेश दिला.

Conclusion:मंगळवारी सकाळपासूनच शिवजयंतीच्या निमित्ताने सगळीकडे आनंदी वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळाले. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांच्याच हातात भगव्या पताका पाहायला मिळाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर केले होते. लेझीम, झांज पथक हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी जिजाऊ वंदना सामूहिक रित्या करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.