ETV Bharat / state

बीड: पाणीप्रश्न मिटला मात्र वादळवाऱ्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान - बीड ताज्या बातम्या

मागील पंधरा दिवसात पाऊस आखडल्याने सुकलेले पिके बघून शेतकऱ्यांचे तोंडही सुकू लागले होते. मागील दोन दिवसात जोरदार पावसाचे अगमण झाले. याच बरोबर वादळ-वारेही सुटल्याने उभा असलेली पिके झोपली.

ऊस
ऊस
author img

By

Published : Sep 11, 2020, 4:33 AM IST

बीड - मागील पंधरा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस दोन दिवसापासून जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. पावसाबरोबरच वादळी वारे आल्याने ऊस उत्पादक आणि बाजरी उत्पादक शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेला पाऊस सोयाबीन व तुरीसाठी पोषक आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

बीडमध्ये पाऊस
पंधरा दिवस तोंड दडवलेला पाऊस पुन्हा मागील दोन-तीन दिवसात जिल्ह्यात सक्रिया झाला. पावसासोबत वादळवारे असल्याने उस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात असलेल्या 144 लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये 72 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहर्तावरच पावसाचे आगमण झाले होते. अगदी वेळच्या वेळेला पाऊस पडत गेल्याने यावर्षी पिके जोरदार आले होते. पंरतु मागील पंधरा दिवसात पावसाने तोंड दडविल्याने नगदी पिक असलेले सोयाबीन आणि कापूस सुकू लागले होते. परंतु अचानक दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण झाले होते मात्र पावसाबरोबर वादळी वारे आल्यामुळे देखील ठिकाणी स उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस लोळला असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी आबासाहेब शेंडगे म्हणाले.मागील पंधरा दिवसात पाऊस आखडल्याने सुकलेले पिके बघून शेतकऱ्यांचे तोंडही सुकू लागले होते. मागील दोन दिवसात जोरदार पावसाचे अगमण झाले. याच बरोबर वादळ-वारेही सुटल्याने उभा असलेली पिके झोपली. यात ऊस, बाजरी आणि मकाचा समावेश आहे. तर हा पाऊस कापूस, सोयाबीनसाठी लाभदायक ठरला आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजरी काढणीला आलेली आहे. पाऊस आता सुरूच राहिला तर हाती आलेले पिक पदरात पडण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहूतेक तलाव भरले असून येणाऱ्या काळातील पाणीप्रश्न मात्र मिटला आहे.

हेही वाचा - पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे काश्मिरात सीमेवर शस्त्रास्रांचा पुरवठा, सुरक्षा दल सतर्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.