ETV Bharat / state

हॉलमार्क सोने खरेदी ग्राहकांच्या फायद्याचीच; आता सोन्याच्या वस्तूवर दुकानदाराचाही येणार स्टॅम्प - सोने विक्री

सोने व दागिना हा विशेष करून महिलांसाठी आवडीचा विषय आहे. आता केंद्र सरकारने या सोन्याच्या शुद्धते बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हॉलमार्क सोने खरेदी विक्री बाबत अजून म्हणावा, तशी अंमलबजावणी चोखपणे होत नसली तरी भविष्यात ज्वेलर्स चालकांना हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी- विक्री करता येणार आहे. हा निर्णय ग्राहकांसाठी फायद्याचा असल्याचे सोनारांनी सांगितले.

GOLD
GOLD
author img

By

Published : Jun 24, 2021, 11:57 AM IST

बीड - सोने विक्री करताना सोनारांना आता हॉलमार्क असलेलेच सोने विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचा देखील लोगो सोने खरेदी केलेल्या वस्तूवर राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचे सोने मिळेल व ज्या ठिकाणाहून सोने घेतले त्या दुकानदाराच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जरी ते सोने मोडले तरी हॉलमार्क असल्यामुळे सोन्याच्या वस्तु चे चांगले पैसे ग्राहकांना मिळू शकतील, अशी माहिती बीड येथील सचिन ज्वेलर्सच्या प्रमुख कल्पना डहाळे यांनी दिली.

सोने व दागिना हा विशेष करून महिलांसाठी आवडीचा विषय आहे. आता केंद्र सरकारने या सोन्याच्या शुद्धते बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हॉलमार्क सोने खरेदी विक्री बाबत अजून म्हणावा, तशी अंमलबजावणी चोखपणे होत नसली तरी भविष्यात ज्वेलर्स चालकांना हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी- विक्री करता येणार आहे. हा निर्णय ग्राहकांसाठी फायद्याचा असल्याचे सोनारांनी सांगितले.

सोन्यावर हॉलमार्क बंधनकारक...

पूर्वीदेखील सोन्याच्या शुद्धतेला प्राधान्य होतेच-

विशेष करून सोन्याचा व्यवसाय हा विश्वासाचा व्यवसाय आहे. सोने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे सोने आम्ही देत आहोतच, आता या सरकारच्या निर्णयामुळे केवळ सोन्यावर हॉलमार्क व आमचा स्टॅम्प येणार आहे. त्यामुळे हा निर्णय आमच्यासाठी देखील चांगला आहे, असे मत कल्पना डहाळे यांनी व्यक्त केले.

ग्राहकांचे समाधान हेच आमच्यासाठी महत्त्वाचे-

अनेक ग्राहक हौस म्हणून सोने खरेदी करण्यासाठी येतात. तर काही ग्राहक सोन्यामध्ये देखील गूंतवणूक करतात. या ग्राहकांना शुद्ध व उत्तम सोने देण्याची आमची जबाबदारी आहे. कारण ग्राहकाचे समाधान हेच आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे बीड शहरातील अनेक सोने-चांदी व्यापाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.