ETV Bharat / state

बीड मतदार संघातील आठ रस्त्यांसाठी 30 कोटी मंजूर - परळी

बीड मतदार संघातील ८ गावांच्या रसत्यांच्या कामासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. या कामासाठी शासनाकडून ३० कोटी १० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

जयदत्त क्षीरसागर यांचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 4, 2019, 11:30 PM IST

बीड - बीड मतदार संघातील ८ गावांच्या रस्त्यांच्या कामासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. ना. जयदत्त क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळवून घेतली आहे. या कामासाठी शासनाकडून ३० कोटी १० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

बीड मतदार संघातील काही प्रमुख गावांसाठी रस्ते जोडणीचे प्रस्ताव ना. जयदत्त क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात सादर केले होते. यात बीड - इमामपूर - नेकनूर - अंबिल वडगाव - पोथरा - चांदणी - पालसिंगन, या बीड ते पालसिंगन रस्ता सुधारणेसाठी १२ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. तसेच खर्डा - चौसाळा - साळेगाव - अंबाजोगाई - परळी रस्त्यालगत गोलंग्री ते सुलतानपूर व पालसिंगन ते नांदूरघाट रस्ता सुधारणेसाठी ५ कोटी २० लाख, मंझरी फाटा ते मांजरसुंबा रस्ता सुधारणेसाठी 4 कोटी, कळंब - आनंदवाडी - कर्झणी या अंतर्गत मोठी कर्झणी ते कळसंबर रस्ता सुधारणेसाठी ३ कोटी, करचुंडी ते बेलखंडी पाटोदा रस्ता सुधारण्यासाठी २ कोटी ९० लक्ष रूपये, चर्‍हाटा फाटा काळे स्मारक ते बेलखंडी पाटोदा रस्ता सुधारणेसाठी १ कोटी ३० लक्ष, तर अंजनवती या ठिकाणी गाव अंतर्गत रस्ता सुधारणेसाठी १ कोटी रूपये मंजूर झाले असून देवी बाभूळगाव ते चौसाळा गाव अंतर्गत रस्त्यासाठी ७० लक्ष रूपये असे एकूण ८ रस्त्यांसाठी ३० कोटी १० लक्ष रूपये चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहेत.

ना. जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघातील विविध गावांच्या रस्त्यांचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. रस्ते जोडणीच्या कामाला प्राधान्य दिल्यामुळे अनेक गावे एकमेकांना जोडली जात आहेत. यामुळे दळणवळण सोपे होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Intro:बीड मतदार संघातील 8 रस्त्यांसाठी 30 कोटी रूपये मंजूर 

बीड - बीड मतदार संघातील 8 ठिकाणच्या गावांसाठी रस्ते कामा करीता प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. ना.जयदत्त क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात या कामांना मंजूरी मिळवून घेतली असून या कामासाठी 30 कोटी 10 लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

बीड मतदार संघातील काही प्रमुख गावांसाठी रस्ते जोडणीचे प्रस्ताव ना.जयदत्त क्षीरसागर यांनी दाखल केले होते. बीड - इमामपूर - नेकनूर - अंबिल वडगाव - पोथरा - चांदणी - पालसिंगन हा बीड ते नेकनूर ते पालसिंगन रस्ता सुधारणा करणेसाठी 12 कोटी रूपये मंजूर झाले आहेत तसेच खर्डा - चौसाळा - साळेगाव - अंबाजोगाई - परळी रस्त्यालगत गोलंग्री ते सुलतानपूर व पालसिंगन ते नांदूरघाट रस्ता सुधारणा 5 कोटी 20 लक्ष, मंझरी फाटा ते मांजरसुंबा रस्ता सुधारणेसाठी 4 कोटी, कळंब - आनंदवाडी - कर्झणी या अंतर्गत मोठी कर्झणी ते कळसंबर 3 कोटी रूपये, करचुंडी ते बेलखंडी पाटोदा रस्ता सुधारण्यासाठी 2 कोटी 90 लक्ष रूपये तर चर्‍हाटा फाटा काळे स्मारक ते बेलखंडी पाटोदा 1 कोटी 30 लक्ष, अंजनवती या ठिकाणी गाव अंतर्गत रस्ता सुधारणा करणेसाठी 1 कोटी रूपये मंजूर झाले असून देवी बाभूळगाव ते चौसाळा गाव अंतर्गत रस्त्यासाठी 70 लक्ष रूपये अशा एकूण 8 रस्त्यांसाठी 30 कोटी 10 लक्ष रूपये चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहेत. ना.जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघातील विविध गावच्या रस्त्यांचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. रस्ते जोडणीच्या कामाला प्राधान्य दिल्यामुळे अनेक गावे एकमेकांना जोडली जात आहेत यामुळे दळणवळण सोपे होऊन नागरीकांना दिलासा मिळणार आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.