बीड : बीडच्या आष्टी तालुक्यात आपण मागील काही दिवसांपूर्वी भेसळयुक्त दूध उत्पादन केले असल्याची घटना ताजी आहे. अशातच पुन्हा एकदा आष्टी तालुक्यात बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटनाही उघडकीस आली आहे. त्यामुळे या बनावट नोटा नेमक्या कुठून आल्या आणि बनावट नोटा देऊन सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे का? याचा शोध घेण्याचे पोलीस प्रशासनापुढे आवाहन आहे.
व्यापाऱ्यांनी बनावट नोटा दिल्या : बीडच्या आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील एका नभाजी घोडके हे आपली उपजीविका शेळीपालन करून भागवतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. हा जोडधंदा त्यांनी गेले अनेक दिवसांपासून चालू केलेला आहे. मात्र घरामध्ये आर्थिक अडचण आल्याने त्यांनी आपल्या काही बकऱ्यांमधील दोन बकऱ्या विकायचे ठरवले. दोन व्यापारी घरी आले व एक बोकड व एक बकरीची किंमत ठरवून त्यांनी बनावट नोटा दिल्या. त्या ठिकाणावरून एक बोकड व एक बकरी घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.
साडे नऊ हजार रुपयात व्यवहार : शेतकर्याचे एक बोकड व एक बकरी विकत घेऊन बनावट नोटा देत फसवणूक करून दोघाजणांनी पाबोरा केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रोडवरील डोंगरगण येथे रोडला लागुनच नबाजी भाऊ घोडके यांचे घर त्याच्याकडे सहा शेळ्या आहेत. मंगळवारी दोन व्यापारी सकाळी आठच्या दरम्यान दुचाकीवरून घरी आले. पाठ बोकड विकायचे आहे का, असे विचारले. घोडके हो बोलल्यानंतर पाठ बोकड असा दोन्हीचा साडे नऊ हजार रुपयात व्यवहार झाला.
बनावट नोटा देऊन गंडा : त्यांची पत्नी कुसुम घरात चहापाणी करत असताना एकाने आत जाऊन पैसे दिले. पत्नीकडून पैसे मोजण्यासाठी हातात घेताच दोन हजाराच्या चार, तर पाचशेच्या तीन असे साडेनऊ हजारांच्या बनावट नोटा दिल्याचे लक्षात आले. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी पाबोरा होता. बनावट नोटा देऊन गंडा घातल्याने शेतकरी कुटुंबाला रडू आवरले नाही. अंभोरा पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालुन या प्रकरणाचा शोध लावावा, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा : Mumbai Crime News : 80 लाखांच्या बनावट नोटा जप्त ; गुन्हे शाखेकडून एका व्यक्तीला अटक