ETV Bharat / state

दिलिप केंद्रे आत्महत्या प्रकरण; प्रेयसी पूजा पाटीलची २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

author img

By

Published : Dec 19, 2019, 10:08 PM IST

बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक पूजा पाटील हिच्या अटकेसाठी जळगावात गेले होते. जळगाव पोलिसांच्या मदतीने शिवाजीनगर पोलिसांनी पूजा हिला ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी बीड येथे आणले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पूजाला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

beed
पूजा गुलाब पाटील

बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेम प्रकरणातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत पोलीस कर्मचाऱ्याची प्रेयसी पूजा पाटील (रा. जळगाव) हिला शिवाजीनगर पोलिसांनी गुरूवारी बीड न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी न्यायालयाने पूजाला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आत्महत्या केलेले पोलीस कर्मचारी दिलिप केंद्रे यांची मागील काही महिन्यांपूर्वीच बीडला बदली झाली होती. ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. जळगाव येथे असताना त्यांचे पूजा गुलाब पाटील या युवतीशी प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, बीडला बदली झाल्यानंतर पूजा पाटील ही दिलीप यांना ब्लॅकमेल करून सतत पैशाची मागणी करीत होती. याला कंटाळून मंगळवारी दिलीप केंद्रे यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. मंगळवारी रात्रीच दिलीप यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पूजा गुलाब पाटीलच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक पूजा पाटील हिच्या अटकेसाठी जळगावात गेले होते. जळगाव पोलिसांच्या मदतीने शिवाजीनगर पोलिसांनी पूजाला ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी बीड येथे आणले. तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. सदर माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिली आहे.

हेही वाचा- गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

Intro:पूजा पाटीलची कोठडीत रवाणगी; २२ डिसेंबर पर्यंत कोठडी; पोलीस आत्महत्या प्रकरण

बीड- बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रेम प्रकरणातून स्वतः स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्या मयत पोलीस कर्मचाऱ्याची प्रेयसी पूजा पाटील (रा. जळगाव) गुरुवारी शिवाजीनगर पोलीस पोलिसांनी बीड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावले आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी आहे की,
प्रेम प्रकरणातून शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी दिलीप केंद्रे यांनी सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणात आरोप असलेल्या पूजा गुलाब पाटील हिला गुरुवारी सकाळी बीड येथे आणल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वीच त्या आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बीडला बदली झाली होती. जळगाव येथे असताना त्यांचे पूजा गुलाब पाटील या युवतीशी प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, बीडला बदली झाल्यानंतर पूजा पाटील ही दिलीप यांना ब्लॅकमेल करून सतत पैशाची मागणी करीत होती. याला कंटाळून मंगळवारी दिलीप केंद्रे यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. या घटनेने खळबळ उडाली होती. मंगळवारी रात्रीच दिलीप यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पूजा गुलाब पाटीलच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला गेला होता. बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक पूजा पाटील हिच्या अटकेसाठी जळगावात गेले होते. जळगाव पोलिसांच्या मदतीने शिवाजीनगर पोलिसांनी पूजा हिला ताब्यात घेऊ न गुरुवारी सकाळी बीड येथे आणले. तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिलीBody:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.