बीड- गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात अन् ढोल ताशाच्या गजरात आज सोमवारी गणरायाचे स्वागत बीडकरांनी केले. यावेळी ठिकठिकाणी रांगोळी व सजावट केलेली पाहायला मिळाली. सकाळ पासूनच गणेश स्थापनेची लगबग सुरु होती. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीच्या स्थापनेची जय्यत तयारी केली आहे. यामध्ये बच्चे कंपनीने देखील पुढाकार घेतला होता. शहरातील सिद्धिविनायक संकुल परिसरात मनपसंद गणेश मुर्ती घेण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात एकूण पावणेदोनशे गणेश मंडळे आहेत.
हेही वाचा-370 कलम रद्द केल्याबद्दल बाप्पाच्या चरणी व्यक्त करणार आनंद - नगरसेवक अरविंद भोसले
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गणरायाच्या स्वागतासाठी भाविक सज्ज आहेत. यंदा गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट असले, तरी दुष्काळ विसरुन गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. शहरातील सिद्धिविनायक संकुल परिसरात आज सोमवारी सकाळपासूनच बच्चे कंपनीने मनपसंद गणेश मूर्ती घेण्यासाठी आपल्या पालकांसह गर्दी केली होती. जिल्ह्यात पावणे दोनशेच्या जवळपास गणेश मंडळे आहेत. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश स्थापनेची तयारी पूर्ण केली आहे. सायंकाळ पर्यंत गणेश स्थापना करण्यात येणार असल्याचे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणेश स्थापना प्रसंगी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठिक-ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते ट्रॅक्टर, टेम्पो घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला गावाकडे वाजत गाजत घेऊन जाण्यासाठी आतूर असल्याचेही यावेळी पहायला मिळाले.