ETV Bharat / state

Ganja Found In Farms : बीडच्या केज तालुक्यात एक लाख चोवीस हजाराचा गांजा सापडला - Ganja found in farms of Kage taluk of Beed

बीडच्या केज तालुक्यात एक लाख चोवीस हजाराचा गांजा सापडला आहे. उन्हाळी मिरचीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी शेतावर छापा टाकून गांजा पकडला आहे.

Ganja Found In Farms
Ganja Found In Farms
author img

By

Published : Jun 8, 2023, 5:11 PM IST

बीड - चिंचपूर येथे उन्हाळी मिरचीच्या शेतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पंचासमक्ष कारवाई केली आहे. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकांत गांजाची लागवड - गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गांजा विकत असल्याचे निदर्शनास येत आहे. याअगोदर आपण पाहिले आहे की आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला. त्यानंतर काही दिवस उलटतात तोच पुन्हा एकदा गेवराई तालुक्यात सिरसदेवी येथे एका भुईमुगाच्या शेतामध्ये गांजा सापडल्याची घटना घडली होती. त्यानंतर फक्त पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मिरचीच्या शेतामध्ये गांजा सापडला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात गांजा लागवडीचे लोण चांगलेच पसरले आहे की काय असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या केज तालुक्यातील चिंचपूर येथे गांजाशेतावर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री ही कारवाई पूर्ण करण्यात आली. शेतकरी सतपाल ग्यानबा घुगे यांनी स्वतःच्या शेतामध्ये उन्हाळी मिरचीची लागवड केलेली असून यामध्ये गांजा या पिकाला कायद्याने प्रतिबंध असतानासुद्धा मिरचीच्या शेतामध्ये, चक्क गांजाच्या झाडांची लागवड केली होती. तो त्याची चोरटी विक्री करत होता. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावेळी त्यांनी त्यांच्या पथकासमवेत सापळा रचून युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचपूर येथील शेत शिवार गाठून गांजाच्या झाडांच्या शेतावर छापा टाकला. यामध्ये साडेसहा ते सात फुटाची नऊ हिरवीगार झाडे आढळली. एकूण 24 किलो 830 ग्रॅम माल आढळून आला. अंदाजे एक लाख 24 हजाराचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला. यावेळी याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या फिर्यादीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या उपस्थितीत, सपोनी योगेश उबाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Discovery of Ganja : शेतामधील शेडमधून 5 लाख 91 हजाराचा गांजा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.