ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडले, माय-लेकीला १० वर्षांची सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत या दोघी तिला पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून सिरसदेवी येथे बसस्थानक परिसरातील स्वत:च्या घरी वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या.

सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे
author img

By

Published : Jul 6, 2019, 12:55 PM IST

बीड - अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या माय-लेकींना शुक्रवारी बीड येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एस. शेख यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सुनिता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे (रा. सिरसदेवी ता. गेवराई) अशी शिक्षा झालेल्या मायलेकींची नावे आहेत. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडली.

बीड शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत या दोघी तिला पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून सिरसदेवी येथे बसस्थानक परिसरातील स्वत:च्या घरी वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या. पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या महिला फौजदार दिपाली गीते यांनी खोटा ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली होती. यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी गीते यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सिरसदेवी येथे छापा टाकून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पीडित मुलीची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी गीते यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात सुनिता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे या मायलेकींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलामानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांच्यासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणी बाजू मांडली. दराडे यांचा युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे ग्राह्य धरुन न्या. शेख यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील दराडे यांना पैरवी अधिकारी म्हणून आर. बी. माेरे, एस. बी. जाधव, एन. वाय. धनवडे व महिला पोलिस सिंगल यांनी मदत केली.

सात साक्षीदार तपासले-

या प्रकरणी सरकारी पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित, तक्रारदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. यामुळे दोन्ही आरोपी महिलांना शिक्षा झाली.

Intro: बातमीबरोबर सरकारी वकील मंजुषा दराडे यांचा बाईट मोजो वरून अपलोड केला आहे
******
अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडले; मायलेकीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा 
बीडच्या विशेष सत्र न्यायालयाचा निकाल 

बीड- अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मायलेकींना बीड येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडली होती. सुनिता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे(रा. सिरसदेवी ता गेवराई) अशी शिक्षा झालेल्या मायलेकीची नावे आहेत. 

 बीड शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत सुनिता व शारदा चांदणे या मायलेकींनी  तिला पैशांचे अमिष दाखवून सिरसदेवी येथे बसस्थानक परिसरातील स्वत:च्या घरी तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होत्या. पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या महिला फौजदार दिपाली गिते यांनी डमी ग्राहक पाठवून या माहितीची खातरजमा केली होती. यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी पीएसआय दीपाली गिते यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून सिरसदेवी येथे छापा टाकून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला  होता. पिडीत मुलीची सुटका करण्यात आली होती.  या प्रकरणी गिते यांच्या तक्रारीवरुन तलवाडा पोलिस ठाण्यात सुनिता मच्छिंद्र चांदणे व शारदा मच्छिंद्र चांदणे या मायलेकीविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलामानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. 
विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी या प्रकरणी बाजू मांडली. दराडे यांचा युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्या. शेख यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये दोषी धरुन दहा वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील दराडे यांना पैरवी अधिकारी म्हणून आर. बी. माेरे, एस. बी. जाधव, एन. वाय. धनवडे व महिला पोलिस सिंगल यांनी मदत केली. 
सात साक्षीदार तपासले-
या प्रकरणी सरकारी पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित, तक्रारदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या यामुळे दोन्ही मायलेकी शिक्षेपर्यंत पोहचू शकल्याBody:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.