बीड: अंबाजोगाई तालुक्यात गीत्ता या गावात घरगुती कार्यक्रमानिमित्त गावातील महिलांना जेवणाचे निमंत्रण दिले असता, या जेवणामध्ये विषबाधा झाल्याने गीत्ता या गावातील 34 महिलांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल केले आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वैद्यकीय टीमने अतोनात प्रयत्न करून धोक्याच्या बाहेर काढले आहे.
34 महिला तात्काळ उपचार: हा कार्यक्रम वैयक्तिक असल्यामुळे गावातीलच महिला या कार्यक्रमासाठी बोलवले होते. गीत्ता येथून 34 महिला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या दाखल झालेल्या 34 महिला तात्काळ उपचार मिळाल्यामुळे धोक्याच्या बाहेर आहेत, अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, डॉ. राकेश जाधव, डॉ. सुमेध वाघमारे यांनी सांगितले आहे.
ऑब्झर्वेशनसाठी रुग्णांना भरती: स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात गीता या गावातील एकूण 34 रुग्ण जेवणामधून विषबाधा झाल्यामुळे या ठिकाणी आलेल्या आहेत. सर्व रुग्णांची तपासणी केली असून त्यांना माइंड स्वरूपाचे कुणाला उलटी होणं, मळमळ होणे, डोकं दुखणे, अशा प्रकारचा त्रास आढळून आलेला आहे. या 34 पैकी, 24 रुग्णांना आपण ऑब्झर्वेशनसाठी रुग्णांना भरती करण्यात आलेलं आहे.
काळजी करण्यासारखं काही कारण नाही: यापैकी कुठलाही रुग्ण सिरीयस लक्षण नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. सर्व रुग्णांची आम्ही काळजी घेत आहोत, पैकी काही रुग्ण आम्ही वॉर्ड नंबर 19 मध्ये भरती केलेले आहेत. उर्वरित रुग्ण हे 20 नंबरच्या वार्डमध्ये आमच्या निदर्शनाखाली आहेत. बहुतेक सर्वच रुग्णही महिला आहेत. आणि त्यांना माइंड स्वरूपाचे लक्षणे आहेत, तरी काही जणांची तब्येत ठीक आहे.