बीड - अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग, फराह खान यांच्याविरोधात बीडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिश्चन समाजाचा पवित्र ग्रंथ बायबलमधील 'हलेलुया' या शब्दाचा विपर्यास केल्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्फा ओमेगा ख्रिश्चन संघटनेचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी शनिवारी तक्रार दाखल केली आहे.
'बॅक बेंचर्स' हा कॉमेडी शो फ्लिपकार्डच्या अॅपवर चालतो. २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी रविना टंडन, फराह खान, भारती सिंग व हुजेफर क्यूजर यांनी ख्रिश्चन समाजाच्या बायबलमधील 'हलेलुया' या पवित्र शब्दाचा विपर्यास करत जाहीरपणे चुकीचा अर्थ सांगितला.
हेही वाचा -रवीना, फराह खान आणि भारतीविरोधात चंदिगढमध्ये आणखी एक तक्रार दाखल
तक्रारदार आशिष शिंदे यांनी याबाबत सांगितले की, रविना टंडन यांच्या मते 'हलेलुया' म्हणजे स्त्री व पुरुष यांच्यातील संबंधाच्या बाबतीत हा शब्द प्रयोग केला जातो. हे अत्यंत चुकीचे वक्तव्य रविना टंडन आणि त्यांच्या बरोबरच्या इतर तिघांनी केलेले आहे. याप्रकरणी ख्रिश्चन समाजाच्या वतीने बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम २९५ आणि ३४ या अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत बोलण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नकार दिला आहे.
हेही वाचा -लहान मुलांच्या इच्छेसाठी अक्षय-कॅटरिनाचा 'तेरी ओर' गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल