बीड - ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर धडक ( Tractor And PickUp Accident Beed ) झाली. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला ( Beed Accident Father And Son Dead ) आहे. तर मुलीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बीड मधील गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन (शनीचे) रोडवर बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षसभुवन रोडवर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की, यामध्ये राक्षसभूवन येथील चंद्रशेखर शामराज पाठक ( वय ३९ ) व त्यांचा मुलगा आर्यन ( वय १२ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक (वय ११) हिच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून शवविच्छेदन साठी गेवराई उपजिल्हा रूग्णालय दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - Manmohan Singh : 'कमी बोललो, काम जास्त केले'; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल