ETV Bharat / state

खत, बियाणे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण

गेवराई शहरातील कोल्हेर रोड या ठिकाणी किनगावचे शेतकरी मोतीराम अच्युतराव चाळक (४०) सोमवारी सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत खत व बियाणे खरेदीसाठी जात होते. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना विचारपूस न करता बेदम मारहाण केली त्यात ते जबर जखमी झाले आहेत.

farmers beaten by police in beed
गावातील शिष्टमंडळाची अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
author img

By

Published : Jun 2, 2021, 11:12 AM IST

Updated : Jun 2, 2021, 1:48 PM IST

बीड - जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असतांना अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्र सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु येथे शेतकरी खते व बि-बियाणे खरेदी करण्यासाठी गेला असता त्याला अमानुषपणे पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना गेवराई येथे घडली आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

खत, बियाणे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण

शेतकऱ्यांना खते व बियाणे थेट बांधावर -

गेवराई शहरातील कोल्हेर रोड या ठिकाणी किनगावचे शेतकरी मोतीराम अच्युतराव चाळक (४०) सोमवारी सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत खत व बियाणे खरेदीसाठी जात होते. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना विचारपूस न करता बेदम मारहाण केली त्यात ते जबर जखमी झाले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासून मारहाण करणारे जे पोलीस आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि शासनाने शेतकऱ्यांना खते व बियाणे थेट बांधावर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे.

संबंधित पोलिसांविरोधात कारवाई करण्यास भाग पाडू -

गेवराई तालुक्यातील किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांची मंगळवारी सकाळी पूजा मोरे यांनी भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले मोतीराम चाळक यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. पोलीस अधीक्षक बीड व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना बोलून संबंधित पोलिसांविरोधात कारवाई करण्यास भाग पाडू असे आश्वासन राजू शेट्टी यांनी दिले.

दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करावे -

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अशाप्रकारे अमानुषपणे मारहाण होत असेल तर हे सरकारचे अपयश आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी खते व बियाणे खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. परंतू पोलीस मात्र, वाळू माफिया व इतर अवैध धंदे करणारांना अभय देऊन शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ लागले आहेत. रक्षकच भक्षक बनत असतील तर आम्ही हा अन्याय सहन न करता कायदेशीर मार्गाने सामोरे जाण्याशिवाय आमच्या समोर पर्याय राहणार नाही. जर खते व बियाणे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सरकारने याची गंभीर दखल घेऊन दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करावे. शेतकऱ्यांना खते व बियाणे थेट बांधावर देण्याची व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी देखील पूूजा मोरे यांनी केली आहे.

गावातील शिष्टमंडळाची अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन -

या भेटीनंतर सरपंच अरुण चाळक व गावातील शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते - बळीराम शिंदे, ब्रम्हदेव मराठे, गणेश मोरे, करण धुमक तसेच किनगावचे शेतकरी अरूणकाका चाळक, रामप्रसाद चाळक, श्रीकांत चाळक, तुकाराम चाळक, प्रल्हाद चाळक, ज्ञानेश्वर चाळक, उध्दव चाळक, आर्जून चाळक, राजाभाऊ चाळक, संभाजी चाळक उपस्थित होते.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Last Updated : Jun 2, 2021, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.