ETV Bharat / state

डॉक्टरांनी वेळेत इंजेक्शन दिले असते तर माझी ताई वाचली असती...! मृत महिलेच्या भावाचा आरोप - woman died in beed

र्डात इंजेक्शन पोहोच करून देखील दोन तास झाले तरी ते इंजेक्शन रुग्णाला दिले नव्हते. जर डॉक्टरांनी वेळेवर ते इंजेक्शन दिले असते तर माझी ताई वाचली असती. असा आरोप बीडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेचे भाऊ वकील सुभाष कबाडे यांनी केला आहे.

family-members-allege-patient-died-due-to-untimely-injection-in-beed
कोरोना
author img

By

Published : May 21, 2021, 11:40 AM IST

बीड- तब्बल 28 दिवस माझी ताई बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाशी लढत होती. शेवटी डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन खासगी मेडिकलमधून आणून दिले. मात्र, संबंधित वार्डात इंजेक्शन पोहोच करून देखील दोन तास झाले तरी ते इंजेक्शन रुग्णाला दिले नव्हते. जर डॉक्टरांनी वेळेवर ते इंजेक्शन दिले असते तर माझी ताई वाचली असती. असा आरोप बीडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेचे भाऊ वकील सुभाष कबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे कबाडे यांनी याबाबत बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे.

बीड येथील जिल्हा रुग्णालयाचा कोरूना काळातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. एवढेच नाही तर पोलिसांकडून जिल्हा रुग्णालयातील दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावण्याचे प्रकार देखील घडत आहेत. याचाच परिणाम बीडचे जिल्हा रुग्णालय कोरोना रुग्ण मृत्यूचा हॉट स्पॉट बनत चालले आहे. 17 मे रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक 40 वर्षीय महिला केवळ रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दगावली असल्याचा आरोप संबंधित महिलेच्या भावाने केला आहे. याबाबत महिलेचा भाऊ एडवोकेट सुभाष कबाडे यांनी इटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे की, तब्बल 28 दिवस माझी ताई जिल्हा रुग्णालयात कोरोनाशी लढत होती. पहिले चार-पाच दिवस तर आमच्या पेशंटकडे कोणी फिरकलेच नाही. जस-जसे पेशंट सिरियस होऊ लागले तस-तसे आम्ही घाबरून गेलो. शेवटी 17 मे रोजी संबंधित डॉक्टरांनी आम्हाला एक इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितले. ते आम्ही घेऊन परत जिल्हा रुग्णालयात आलो तर इंजेक्शन देणारे डॉक्टर बाहेर निघून गेले. किटमध्ये असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना संबंधित डॉक्टरांनी दिलेले इंजेक्शन आणले आहे ते पेशंटला द्या, म्हटले तर आमचे कोणीच ऐकले नाही. यामध्ये दोन तासापेक्षा अधिक वेळ निघून गेला. दरम्यान आमचे पेशंट दगावले. असे सांगत ते पुढे म्हणाले की, आता माझी ताई परत येणार नाही हे मला माहीत आहे. परंतु असा प्रकार यापुढे जिल्हा रुग्णालयात होऊ नये यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. जर मला इथे न्याय मिळाला नाहीतर मी न्यायालयात जाणार आहे. माझ्या ताईच्या मृत्यूला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते व इतर संबंधित डॉक्टर यांचा हलगर्जीपणा आहे. त्यांचे माझ्याजवळ पुरावे आहेत.

बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या भावाने केलाय..

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे - डॉ. गित्ते

बीड येथील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, 17 मे रोजी घडलेल्या त्या प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत केलेली असल्याचे सांगून याबाबत अधिक काही बोलण्याचे डॉक्टर गित्ते यांनी टाळले.

चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष-

संबंधित प्रकार घडून चार दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटले आहेत. अद्याप पर्यंत त्या प्रकरणाचा चौकशी अहवाल पुढे आलेला नाही. असे प्रकार बीडच्या जिल्हा रुग्णालयात घडत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी उपस्थित केला असून या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.